आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Young Man Threatens Woman In Aurangabad | I Will Say 'I Love You' Or Put Up A Photo Banner In The Street , FIR To Kranti Chowk Police Station मला 'I Love You

औरंगाबादमध्ये मजनूची महिलेला धमकी:'I Love You' म्हण, नाहीतर गल्लीत फोटोचे बॅनर लावेन; पोलिस ठाण्यात 'प्रेमाचा पंचनामा' सुरू

औरंगााबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'I Love You' म्हण नाहीतर गल्लीत बॅनेर लावेन, अशी धमकी एका मजनूने विवाहित महिलेला दिल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सचिन दाभाडे असे या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे फिर्यादी आणि सचिन हे दोघेही एकाच गल्लीत राहतात. आरोपीने फिर्यादीशी जवळीक निर्माण केली होती. त्यानंतर तो वारंवार महिलेला संपर्क साधून मला 'आय लव्ह यू' म्हटले नाही तर मी तुझे फोटो गल्लीतल्या मुलांकडे व्हायरल करेल, अशी धमकी आरोपीने दिली होती. सदरील घटनेतील प्रेमाचा पंचनामा हा शहरातील क्रांती चौक पोलिस ठाण्यात सुरू आहे.

विवाहितेला एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या एका मजनू विरोधात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने आधी विवाहितेशी ओळख करून मोबाईल नंबर मिळवला त्यानंतर मला 'आय लव्ह यू म्हण' अन्यथा तुझ्या फोटोचे गल्लीत बॅनर लावेन, अशी धमकी दिली. त्यामुळे अखेर विवाहितेने पोलिसात धाव घेत या मजनू विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महिलेला दिली धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तुझ्या नवऱ्याविषयी तुला काही सांगायचे आहे', असे म्हणत आरोपी सचिनने पीडितेला आधी विश्वासात घेतले. त्यानंतर पुढे तिचा व्हॉट्सअॅप क्रमांक, इन्स्टाग्राम आयडी व पासवर्ड मिळवला. दरम्यानच्या काळात दोघांमध्ये ओळख झाली. मात्र त्यानंतर सचिन पीडितेला वारंवार संपर्क साधून 'आय लव्ह यू' म्हणाली नाहीस तर तुझे फोटो गल्लीतील मुलांच्या ग्रुपवर व्हायरल करेन', अशी धमकी दिली. सोबतच तुझ्या फोटोचे गल्लीत बॅनर लावीन अशीही धमकी दिली.

महिलेची पोलिसांत धाव

सचिन याच्याकडून सतत येणाऱ्या मॅसेजमुळे महिला कंटाळली होती. त्यामुळे तिने सचिनचा नंबर ब्लॉक केला. मात्र त्यानंतर सुद्धा त्याने दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधत धमकी देत शिवीगाळ केली. या त्रासाला कंटाळून पीडितेने क्रांती चौक ठाण्यात धाव घेऊन दाभाडेविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...