आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएस क्रिकेट ट्रॉफी:यंग इलेव्हनची एलिट क्लबवर मात

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झालानी टूल्स मैदानावर सुरू असलेल्या पीएस क्रिकेट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत यंग इलेव्हन संघाने विजय मिळवला. बुधवारी झालेल्या सामन्यात यंग इलेव्हनने एलिट क्रिकेट क्लबवर १९ धावांनी मात केली. सामन्यात गोलंदाज सय्यद अब्दुल वहिद सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यंग इलेव्हनचा डाव १९.१ षटकांत १३१ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात एलिट क्लब १८.३ षटकांत ११२ धावांवर ढेपाळला. यंग इलेव्हनच्या सय्यद अब्दुल वहिदने १७ धावा देत ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत संघाचा विजय सुकर केला.

बातम्या आणखी आहेत...