आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएस क्रिकेट ट्रॉफी:यंग इलेव्हनची कुंटे स्पोर्ट्स संघावर 8 गड्यांनी मात; मधुर पटेल सामनावीर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झालानी टुल्स मैदानावर सुरू असलेल्या पीएस क्रिकेट ट्रॉफीमध्ये यंग इलेव्हन संघाने विजय मिळवला. सामन्यात यंग इलेव्हनने कुंटे स्पोर्ट्स संघाला ८ गड्यांनी पराभूत केले. मधुर पटेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कुंटे संघाला १९.४ षटकांत अवघ्या १११ धावा उभरत्या आल्या. यात संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर गोपाल दाड भोपळाही फोडू शकला नाही. कार्तिक बाकलिवाल ९ धावांवर परतला. शुभम कांबळेने सर्वाधिक ३३ धावा काढल्या. त्याने ३४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचला. दिनेश कुंटेने १५ धावा जोडल्या. जयेश कुंटे (०) व संदीप सानप (४) अपयशी ठरले. राजेंद्र चोपडाने २० चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने २४ धावा काढत संघाला शंभरी गाठून दिली. वाल्मिक जाधवने ९ धावा केल्या. यंग इलेव्हनकडून ऋषिकेश तरडेने १६ धावांत २ आणि सय्यद अब्दुल वाहिदने २२ धावांत २ गडी बाद केले. शुभम मोहिते, प्रविण क्षिरसागर, अमित पाठक, स्वप्निल चव्हाणने प्रत्येकी एक-एक गडी टिपला.

स्वप्निल व मधुरची अर्धशतकी भागीदारी

प्रत्युत्तरात यंग इलेव्हन संघाने अवघ्या ९.४ षटकांत २ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात स्वप्निल खडसे आणि मधुर पटेल जोडीने ८१ धावांची महत्वपुर्ण भागीदारी करत संघाला विजयी केले. सलामीवीर स्वप्निल खडसेने २४ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार सणसणीत चौकार व ३ षटकार खेचत ४१ धावा काढल्या.

मधुर पटेलने २१ चेंडूंत ४ चौकार व ४ उत्तुंग षटकार लगावत सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. या दोन्ही सलामीवीर जोडीला गोपाल दाडने बाद केले. राहुल शर्मा ३ धावांवर नाबाद राहिला. अष्टपैलू अमित पाठकने ६ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचत नाबाद २० धावांची विजयी खेळी केली. कुंटेकडून गोपाल दाडने ३६ धावा देत २ गडी बाद केले.

बातम्या आणखी आहेत...