आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया आठवड्यात लवकरच पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना मी त्यांना विचारले की, तुम्ही पुढील दोन मिनिटांत कागदावर लिहू शकता का, तुम्हाला कोणती नोकरी हवी आहे आणि तुम्ही मार्च २०२३ मध्ये पास झाल्यावर कोणत्या पगारावर काम कराल? एकूण १९ जणांनी वेळेवर कागद जमा केले. ५०% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी २५ हजार रुपये पगार लिहिला आणि काहींनी ५० हजार. त्यापैकी जास्त पगार लिहिणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना मी स्टेजवर बोलावले आणि म्हणालो, त्याच कागदावर मोठ्या पगारासाठी काय काम करू शकता, असे लिहा. स्मार्ट दिसणाऱ्या २०-२१ वर्षांच्या दोन्ही विद्यार्थ्यांनी सारखेच उत्तर लिहिले...‘काहीही’... तुम्हीही त्यांच्यापैकीच असाल आणि असेच उत्तर देणार असाल तर ही गोष्ट तुमच्यासाठीच आहे...
बिहारचा निरंजनकुमार (२५) फक्त बारावी पास आहे. त्याच्यात कामाचे नेतृत्व करणे आणि दुसऱ्याकडून काम करून घेण्याची क्षमता होती. शिवाय तो चांगल्या प्रकारे हिंदी बाेलू शकत होता. सुमारे १८ महिन्यांआधी त्याला १.२५ लाख भारतीय रुपये (नेपाळी चलनात २ लाख ) महिना एका कॉलसेंटरमध्ये प्रमुखपदाची नोकरी मिळाली, पण कामाचे ठिकाण नेपाळमध्ये काठमांडू होते. काही विचार न करता त्याने नोकरीसाठी होकार दिला. त्याचे काम तेथील कामावर नजर ठेवण्याबरोबरच हिंदी बोलणाऱ्या तरुणांची भरती करण्याचे आणि चीनमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांशी कोऑर्डिनेट करणे होते.
त्याच्या कामात कॉलसेंटरचे सेटअप करण्याबराेबरच कामाचा विस्तार करणेही होते. त्याचा अर्थ एक सेंटर स्थापित झाल्यानंतर त्याचे काम यशस्वी चालल्यानंतर पुन्हा दुसरे सेंटर स्थापित करायचे हाेते. दरम्यान त्याने तीन सेंटर उघडले आणि त्याचे काम यशस्वीपणे पूर्ण केले. कंपनी अॅक्ट ऑफ नेपालअंतर्गत त्याची कंपनी नोंदणीकृत होती आणि मार्केटिंगसाठी कॉलसेंटरची परवानगी होती. तथापि, मूळ चिनी मालकांनी बिझनेस व्हिसा मिळवला होता. कमी दर्जाच्या कर्मचाऱ्यांना याची फारशी माहिती नव्हती की, ते झटपट कर्ज अॅप कंपनीचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांना भारतातील कमकुवत आर्थिक स्तरातील लोकांना पैसे देऊन त्यांची फसवणूक करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. कर्मचारी हळूहळू जास्त पगाराला बळी पडले, नंतर चीनमधील अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बेकायदा काम करू लागले. उदा. कर्जदाराच्या फोनवरून माहिती चोरणे, फोटो मॉर्फ करणे, ब्लॅकमेल करणे आणि जास्तीत जास्त पैसे उकळणे. गेल्या काही महिन्यांत त्यांच्या कारवाया इतक्या वाढल्या की, जुलैमध्ये नेपाळ पोलिसांच्या मदतीने भारतीय पोलिसांना तेथे छापे टाकावे लागले. बोधगया येथे राहणाऱ्या निरंजनला २५ जुलै रोजी छाप्यानंतर काठमांडू तुरुंगात टाकण्यात आले. त्याच्या फोनमध्ये त्याच् चिनी बॉसेसचे नंबर होते. हा त्याच मानसिकतेचा परिणाम आहे, जेव्हा तुम्ही म्हणता, मी कोणतीही नोकरी करेन!
फंडा असा की, आपली योग्यता ओळखा, त्यानंतर पगार ठरवा. कोणतीही नोकरी करण्याआधी त्या कंपनीच्या कामावर एक नजर टाका.
एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.