आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:पालिकेच्या अतिक्रमण हटावो पथकावर तरुणांचा हल्ला, गोंधळानंतरही पालिकेने हटविले अतिक्रमण, आरोपी अटक करण्याची मागणी

हिंगोली4 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील भाजी मंडई भागात अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकावर काही तरुणांनी हल्ला करून मारहाण केल्याची घटना गुरुवारी ता. ८ सकाळी आकरा वाजता घडली आहे. त्यामुळे भाजी मंडई भागात एकच गोंधळ उडाला. मात्र त्यानंतरही पालिकेच्या पथकाने संपूर्ण अतिक्रमण हटवले. या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी पालिका कर्मचाऱ्यांनी केली आहे.

हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक, भाजीमंडई या भागात अतिक्रमण झाले होते. त्यामुळे या भागातून सकाळी व सायंकाळच्या वेळी चालणे देखील कठीण झाले होते. तर किरकोळ धक्का लागण्याच्या कारणावरून हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. त्यानंतर तत्कालीन पालिका मुख्याधिकार रामदास पाटील यांनी शहरातील अतिक्रमण हटविण्यास पुढाकार घेतला. त्यानंतर शहरातील बहुतांश भागातील अतिक्रमण हटविण्यात आले.

त्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन दिवसांपासून भाजीमंडईमध्ये झालेले अतिक्रमण काढले जात आहे. त्यानुसार आज सकाळी पालिकेचे अभियंता गजानन हिरेमठ, कर्मचारी विजय शिखरे यांचे पथक अतिक्रमण काढण्यासाठी गेले. त्यावेळी जमावाने त्यांच्याश हुज्जत घालून अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविला. त्यानंतर काही तरुणांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत शाब्दीक चकमक सुरु झाली. त्यानंतर तरुणांच्या गटाने कर्मचाऱ्यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. त्यामुळे भाजी मंडई भागात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर प्रकरण शांत झाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटविले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अखील सय्यद, उपनिरीक्षक नितीन केणेकर, मनोज पांडे यांच्यासह दंगा काबू पथकाने घटनास्थळी घाव घेऊन जमाव पांगवला. तसेच पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर अजय कुरूवाडे देखील घटनास्थळी दाखल झाले. पालिका कर्मचाऱ्यांनी घडलेला प्रकार त्यांना सांगितला.

दरम्यान, दुपारी दोन वाजता या भागातील अतिक्रमण हटविल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी थेट हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणात आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी पालिका कर्मचारी संघटनेने केली आहे. या प्रकरणात तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

आरोपीस अटक झाल्यानंतरच कामकाज सुरु होणार ः बाळू बांगर, स्वच्छता निरीक्षक हिंगोली नगर पालिका

शहरातील भाजीमंडईमध्ये झालेले अतिक्रमण काढण्याची कारवाई मागील दोन दिवसापासून सुरु आहे. आज सकाळी पालिकेचे पथक गेल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. मात्र अशा प्रकारानंतरही पालिका कर्मचारी घाबरणार नाही. वरिष्ठांच्या आदेशानुसार अतिक्रमण काढले जाणार आहे. तर या प्रकरणात आरोपींना अटक झाल्यानंतरच पालिकेचे कामकाज सुरु केले जाईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser