आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येचा प्रयत्न:कर्ज नामंजूर झाल्याने तरुणाचा बँकेमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, बँक ऑफ महाराष्ट्र औरंगाबादची घटना

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री राेजगार निर्मिती योजनेअंतर्गत निकषांमध्ये बसत नसल्याने बँकेने कर्ज नामंजूर केले. त्याचा राग आल्याने प्रदीप बबन साळवे (३०, रा. रमानगर) याने 21 सप्टेंबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्रच्या सिडकाे एन-१ येथील झोनल कार्यालयात अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या सिडकाे एन-१ येथील झोनल कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक उमाकांत केसगिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, साळवे हा दुपारी दीड वाजता सुरक्षा रक्षकांशी जोरजोरात वाद घालत हाेता. तेव्हाच त्याने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून घेतला. अधिकाऱ्यांनी त्याला विचारपूस केली असता त्याने कारण सांगितले. तुम्ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून कर्ज का देत नाही, असा प्रश्न केला. त्यावर अधिकाऱ्यांनी सिबिल रेकॉर्ड खराब असणे, मागणीप्रमाणे खरेदी करणाऱ्या मशीनचा जीएसटी क्रमांक नसणे, अपेक्षित आयकर रिटर्न भरलेला नसल्यामुळे फाइल नियमात बसत नसल्याचे सांगितले. तरीही त्याने स्वत:ला पेटवून घेतो, असे म्हणत शिवीगाळ केली. याप्रकरणी प्रदीप साळवे याच्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...