आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौरट्यांचा हैदोस:रात्री कामाहून घरी परतत असताना रस्त्यात अडवून मारहाण; दोघांना अटक, एक आरोपी फरार

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रात्री कंपनीच्या बसमधून उतरुन घरी जाणाऱ्या तरुणाला रस्‍त्यात अडवून चोरट्यांनी मारहाण केल्याची घटना आंबेडकरनगर चौकाजवळ घडली. चोरट्यांनी धमकी देऊन तरुणाकडील पैसे घेतले. गुरुवारी (ता. 28) ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांपैकी 2 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

31 जुलैपर्यंत कोठडी

सचिन देविदास जाधव (वय 25) आणि शेख उमेर शेख आरेफ (वय 29) अशी अटक करण्‍यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्‍यांना 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एम.एम. माळी यांनी आज दिले.

नेमके काय घडले?

आंबेडकरनगर चौकाजवळील एसबीआय क्वाटर्स येथे राहणारे विशाल चव्‍हाण यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार, रात्री 11 वाजेच्‍या सुमारास ते काम संपवून कंपनीच्‍या बसमधून आंबेडकरनगर चौकात उतरले. तेथून ते घराकडे पायी निघाले असता रस्‍त्‍यात तिघांनी त्‍यांना अडवले. त्‍यातील एकाने तक्रारदाराला मारहाण करण्‍याची धमकी दिली, दुसऱ्या आरोपीने त्‍यांच्‍या पॅन्‍टच्‍या खिशातील पैशांचे पाकिट काढून घेत पळ काढला; तर, तिसऱ्या आरोपीने तुझ्या जवळ जे काही आहे ते देवून टाक, असे म्हणत मारहाण केली. तेव्हाच तेथे गस्‍तीवर असणारे पोलिस आले. त्‍यांनी दोघा आरोपींना पकडले. प्रकरणात सिडको पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. विशेष म्हणजे अटक करण्‍यात आलेला शेख उमेर याच्‍या विरोधात अशा प्रकारचे अनेक गुन्‍हे दाखल आहेत.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता सहायक सरकारी वकिल जरीना दुरार्णी यांनी सांगितले की, गुन्‍ह्यातील पसार आरोपीला अटक करुन चोरलेला ऐवज हस्‍तगत करायचा आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी द्यावी. न्यायालयाने ही विनंती मान्य करत आरोपींना 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली.

बातम्या आणखी आहेत...