आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:चौघांची तरुणास मारहाण; शनिवारी सकाळी कांचनवाडी येथे ही घटना घडली, सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्ड्रिंक्स मागितले असता शिवी दिली, असे वाटल्याने दुकानदारासह तिघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ रमेश कवळे (१८, रा. कांचनवाडी) शनिवारी सकाळी तो कांचनवाडी येथील ऋषिकेश दहिवाल यांच्या किराणा दुकानावर कोल्ड्रिंक पिण्यासाठी गेला. दुकानावर ओमकार दहिवाल होता. त्याच्याकडे सौरभने कोल्ड्रिंकची मागणी केली. यावर सौरभने शिवी दिली, असे वाटल्याने ओमकारने त्याचा काका संदीप दहिवाल, चुलता अभिषेक दहिवाल, ऋषिकेश दहिवाल यांना बोलावत सौरभला मारहाण केली. सौरभने का मारत आहात, असा प्रश्न विचारला असता जास्त माजलास का.. आम्हाला शिवीगाळ करतो? असे म्हणत पुन्हा मारहाण केली. ऋषिकेशने सौरभच्या डोक्यात लाकडी दांडा मारत त्याला गंभीर जखमी केले. मारहाणीत सौरभच्या डोक्यातून रक्त निघत असल्याने त्याचा मावस भाऊ कृष्णा मरगळ याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार थापे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...