आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Youth Climbed The Tower And Kept Threatening To Commit Suicide For Demand Of Gharkul,; High Voltage Drama Ended After The MLA Made A Video Call And Asked Him To Come Down

घरकुलसाठी आत्महत्येची धमकी:घरकुल योजनेसाठी टॉवरवर चढला युवक, तासभर देत राहिला आत्महत्येची धमकी; आमदाराने व्हिडिओ कॉल केल्यानंतर संपला हायव्होल्टेज ड्रामा

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गावकऱ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता

औंढा नागनाथ तालुक्यातील तुर्कपिंपरी गावात सोमवारी (ता. १०) सायंकाळी एका तरुणाने घरकुलासाठी मोबाईल टॉवरवर चढून अात्महत्येची धमकी दिली. मात्र गावकऱ्यांनी आमदार संतोष बांगर यांना हा प्रकार कळवला. आमदार बांगर यांनी व्हिडीओ काँॅलींगद्वारे त्याच्याशी संवाद साधून त्याचे प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर तो तरुण खाली उतरला. सुमारे एक तास चाललेल्या या प्रकारानंतर तो तरुण सहिसलामत खाली उतरल्याने गावकऱ्यांनीही सुटकेचा निःश्‍वास सोडला.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुर्क पिंपरी येथील अनंतसागर विठ्ठल शिरसाठ हा कुटुंबासह गावात राहतो. त्याने घरकुलाच्या मागणीसाठी वेळोवेळी पंचायत समिती व ग्रामपंचायतीकडे तगादा लावला. मात्र त्याला अद्यापही घरकुल मिळाले नाही. प्रशासनाकडून घरकुल देण्याचे आश्‍वासनच दिले जात असल्याने अनंतसागर देखील वैतागून गेला होता.

त्यामुळे रागाच्या भरात तो सोमवारी सायंकाळी मोबाईल टॉवरवर चढला. हा प्रकार गावकऱ्यांना कळाल्यानंतर गावकरी तेथे हजर झाले. गावकऱ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. मला घरकुल मिळाल्या शिवाय खाली उतरणार नाही अन बळजबरी केली तर आत्महत्या करेल अशी धमकी देखील दिली. या प्रकारामुळे गावकरी चांगलेच अडचणीत सापडले. त्यानंतर गावकऱ्यांनी शिवसेनेचे औंढा तालुका प्रमुख साहेबराव देशमुख, लल्ला देव, सचिन बिहारी, यादव पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी तातडीने तुर्कपिंपरी गाठले. त्यांनी अनंतसागर यास खाली उतरण्याची विनंती केली. मात्र आमदार संतोष बांगर यांनी आश्‍वासन दिले तरच खाली उतरणार असे त्याने सांगितले. त्यानंतर लल्ला देव यांनी आमदार बांगर यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी अनंतसागर याच्याशी व्हिडिओकॉलद्वारे संवाद साधला. त्याचे सर्व प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर अनंतसागर टॉवरवरून खाली उतरला. सुमारे एक तास चाललेल्या या प्रकारानंतर तो खाली उतरलल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

बातम्या आणखी आहेत...