आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Youth Commit Suicide By Strangulation In Jehur; Record Of Sudden Death At Police Station; News And Live Updates

औराळा:जेहूर येथील युवकांनी गळफास घेत केली आत्महत्या; पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मुत्युची नोंद

औराळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड तालुक्यातील जेहुर येथील मंगेश राजेंद्र रिंढे (वय 23) या तरुणाने स्वत:च्या राहत्या घराच्या शेजारी असलेल्या कांद्याच्या चाळीत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गट क्रमांक 86 मध्ये मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, मंगेश व त्यांची आई गेल्या कित्येक वर्षांपासून जेहुर शिवारातील गट क्रमांक 86 मध्ये स्वताच्या शेतातील घरात राहत होते. दोन दिवसापूर्वी रक्षाबंधनाच्या सनासाठी बहिण आली असल्याने रात्री उशीरापर्यंत गप्पा गोष्टी झाल्या व तो दररोजच्या नित्यनेमाप्रमाणे घराला अगदी लगत असलेल्या कांद्याची असलेल्या चाळीत झोपायला गेला.

सकाळी बहिण उठली आणि ती आपल्या चुलत्याकडे भेटण्यासाठी गेली. तोपर्यंत तो अंथरुणावर झोपलेला होता. बराच उशीर झाला म्हणून आई लेकीला बोलवायला गेली तिकडून येताना कांदाच्या चाळीत मंगेशने स्वताला दोरीने लटकून घेतल्याचे बघितले. आईने आणि बहिणीने आरडाओरड केली. शेजारी असलेले नातेवाईक लटकलेला मंगेशला खाली घेतले परंतु तोपर्यंत मंगेश यांची जीवनज्योत माळवली होती.

नातेवाईकांनी औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह आणला असता वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप कांबळे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मुत्युचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून देवगाव रंगारी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मुत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार शिवनाथ आव्हाळे, विजय धुमाळ करत आहे.

बातम्या आणखी आहेत...