आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:सोनिया गांधींवरील कारवाईचा युवक काँग्रेसकडून निषेध ; केंद्रीय तपास यंत्रणांनी समन्स पाठवल्याच्या निषेधार्थ

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व पक्षाचे नेते राहुल गांधी यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी समन्स पाठवल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी क्रांती चौकात निदर्शने केली. केंद्रातील सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत भाजपविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. शहराध्यक्ष सागर नागरे व जिल्हाध्यक्ष वरुण पाथरीकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. स्वयंरोजगार सेल विभागाचे प्रदेशाध्यक्ष योगेश मसलगे, माजी शहराध्यक्ष सय्यद अक्रम, प्रभाकर मुठे, राहुल सावंत, शेख अथर, मुझ्झफर खान, महिला काँग्रेसच्या सचिव सरोज मसलगे, जिल्हाध्यक्ष हेमा पाटील, शहराध्यक्ष अंजली वडेजे, अमेर अब्दुल सलीम, इरफान पठाण, इद्रिस नवाब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...