आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:विलीगीकरण कक्षातून पळालेल्या तरूणाने यंत्रणेच्या तोंडाला फेस, कनेरगांवनाका गाव सील

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरालगत असलेल्या विलगीकरण कक्षातून पळालेल्या तरुणाने आरोग्य यंत्रणा सोबतच स्थानिक ग्रामपंचायत यंत्रणेच्या तोंडाला अक्षरशः फेस आणला. सदर तरूणाचा स्वॅब नमुना पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याचे सामाजिक संक्रमण शोधतांना यंत्रणेचे अधिकारी चांगलेच घामाघूम झाले. अखेर नऊ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तर शुक्रवारी (ता. १९) कनेरगाव नाका हे गाव सील करण्यात आले.

हिंगोली तालुक्यातील कनेरगाव येथील एक तरुण मंगळवार (ता. ९) मुंबई येथे हिंगोली मध्ये दाखल झाला होता. मुंबईतून आल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने त्याला तातडीने लिंबाळा येथील विलगीकरण कक्षात दाखल केले. मात्र बुधवारी ता. १० या ठिकाणावरून तो गावाकडे केला अन् त्याने एक दिवस मुक्काम ठोकला. मुंबई येथून तो आल्यामुळे सेनगाव तालुक्यातील त्याचे पाहूणेही त्याला भेटायला आले. मात्र हा प्रकार ग्रामपंचायतीला कळल्यानंतर त्याला गुरुवारी (ता. ११)  पुन्हा विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्यानंतर त्याचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याचा अहवाल गुरुवारी (ता. १८) प्राप्त झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. संबंधित तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याचे सामाजिक संक्रमण शोधण्यासाठी धावपळ सुरू झाली.

तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नामदेव कोरडे, ग्रामसेवक सुरेश झिंझाडे यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक कनेरगाव नाका येथे गुरुवारी (ता. १८) दाखल झाले. या पथकाने त्या तरुणाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील ९ जणांना ताब्यात घेऊन हिंगोलीच्या विलगीकरण कक्षात दाखल केले. त्यानंतर सेनगाव येथे त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आहे. रात्री उशिरापर्यंत आरोग्य विभागाची ही कामगिरी सुरू होती.

पाहुण्यांसोबत घेतला रसाळीचा आस्वाद

सदरील तरुणाने कनेरगाव नाका येथे कुटुंबीय सोबतच इतर पाहुण्यांसोबत रसाळीचा आस्वाद घेतला. तसेच घराच्या बांधकामामुळे काही ठिकाणी साहित्याची पाहणी करण्यासाठी ही तो गेला होता. त्यामुळे संपूर्ण कनेरगाव नाका हे गाव कन्टोनमेंट झोन घोषित करून सील करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...