आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लातूर:मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे तरुणाचा तहसील कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

लातूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वर्ष 2020-21 साठी स्थगित करण्याचा निर्णय दिला आहे. याचे पडसाद आता राज्यात उमटायला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे एका उच्च शिक्षित तरुणाने लातूर जिल्ह्यातील चाकूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाकूर तालुक्यातील बोरगाव इथल्या किशोर कदम (वय 25) या तरुणाने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तो सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोकरी आणि शिक्षणात वर्ष 2020-21 मध्ये स्थगिती दिल्याने किशोर याने चाकूरच्या तहसील कार्यालयासमोर विष प्राषण करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

मराठा आरक्षण प्रकरणाची आता घटनात्मक खंडपीठ सुनावणी पुढची सुनावणी करणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने मोठा निर्णय घेत आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता पुढची सुनावणी होईपर्यंत राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्ये मराठा समजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

0