आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुसाट नागमोडी वळण घेत रस्त्याच्या मधोमध कार उभी करून एसटी बस अडवत चाैघांनी दगडफेक केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी बसचालक निंभाेरे यांना बाहेर ओढून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात कार (एमएच २० सीएस ९५९१) चालकासह त्याच्या अन्य साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
एसटी बसचालक मोतीलाल मनाेहर निंभोरे मध्यरात्री १२ वाजता बस घेऊन लिंबेजळगाव-अहमदनगर रस्त्यावरून जात होते. या वेळी भरधाव नागमोडी वळण घेत चालक कार चालवत होता. या वेळी त्याने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याने बसचा कट लागला. त्यानंतर त्याने रस्त्याच्या मधोमध कार उभी करून बस अडवली. त्यानंतर चौघांनी उतरून निंभोरे यांना हातचापटाने मारहाण करत बसची काच फोडली. त्यानंतर ते पसार झाले. पोलिसांनी कारचालकाचा शोध सुरू केला असून लवकरच अटक करणार असल्याचे उपनिरीक्षक संदीप शेवाळे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.