आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातून मित्राचा चाकू भोसकून खून

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
मयत माधव पोले - Divya Marathi
मयत माधव पोले
  • चौघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

औंढा नागनाथ तालुक्यातील माथा येथे वडिलांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून मित्रानेच मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुरुवारी (ता.21) औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनात तालुक्यातील माथा येथे माधव पांडूरंग पोले (19) याचे त्याचा मित्र दिनेश उर्फ दगडू मोळंके याचे वडिल भानुदास मोळंके यांच्या सोबत दोन दिवसांपुर्वी भांडण झाले होते. यावेळी माधव याने भानुदास मोळंके यांना शिवीगाळ केली होती. त्याचा राग दिनेशच्या मनात होता. बुधवारी रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास दिनेश याने माधव पोले याच्या घरी जाऊन त्यास बाहेर बोलावले. त्यानंतर घराजवळच असलेल्या इतर तिघांनी माधव पोले यास पकडले तर दिनेश मोळंके याने चाकूने त्याच्या छातीवर वार केले. यामध्ये माधव पोले याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे, जमादार दिनकर तोंडे, अफसर पठाण, इक्बाल यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणात पोलिसांनी दिनेश मोळंके यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात दिनेश मोळंके याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...