आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळेचे आयोजन:तरुणाईला तंबाखूच्या चक्रव्यूव्हापासून वाचवणे गरजेचे : डॉ. फडणीस

औरंगबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आजचा तरुण खूप मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होताना दिसत आहे. त्यामुळे तरुणाईला कर्करोगासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. तंबाखू खाण्याऱ्यांना एक नव्हे तर, अनेक आजारांना सामोरे जावे लागते. परिणामी, आर्थिक संकटे उभी राहतात. या गोष्टी राष्ट्राच्या प्रगतीसाठी बाधा ठरतात. त्यामुळे ज्या तरुणाईकडे आपण राष्ट्राचे भविष्य म्हणून पाहतो, त्यांना तंबाखूच्या चक्रव्यूव्हापासून वाचवणे गरजेचे आहे, असे मत आयएमएचे अध्यक्ष सचिन फडणीस यांनी व्यक्त केले. इंडियन मेडिकल असोसिएशन औरंगाबादच्या वतीने तंबाखू आणि त्याचे धोके यावर डॉक्टरांसाठी रविवारी आयएमए हॉलमध्ये आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

फडणीस यांनी तरुण पिढी व्यसनाच्या खूप आहारी जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. या वेळी डॉ. अमोल उबाळे, डॉ. संदीप भालसिंग, डॉ. गीतेश दळवी, डॉ. माणिक भिसे यांनी मार्गदर्शन केले. आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ संतोष रंजलकर, डॉ. राजेंद्र शेवाळे, डॉ. उज्ज्वला झंवर, डॉ. संगीता देशपांडे, डॉ. प्रतिमा भाले, डॉ. वर्षा जक्कल आदींनी सहकार्य केले. आयएमएच्य सचिव डॉ. उज्ज्वला दहिफळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेंद्र शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विकास देशमुख यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...