आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समृद्धी’च्या बोगद्याजवळ युवकाचा गोळीबार:फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपींच्या शोधात पोलिसांची 2 पथके रवाना

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील सावंगी बोगद्याजवळ हवेत गोळीबार करणाऱ्या युवकावर फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या शोधासाठी दोन पथके तयार केली आहेत. नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समृद्धी महामार्गाचे नुकतेच उद्घाटन करण्यात झाले. सध्या हा महामार्ग सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

यात सावंगीच्या बोगद्याजवळ एक युवक जीपमधून उतरतो व जीपच्या पुढे येऊन हवेत गोळीबार करायला लागतो. पाहताक्षणी हा व्हिडिओ एखाद्या चित्रपटातील आहे की काय अशी शंका यायला लागते. पण तो खरा असल्याचे समोर आले आहे. फुलंब्री पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या युवकाचे नाव बाळू गायकवाड आहे. तो काळ्या स्कॉर्पिओतून (एमएच २० एफजी २०२०) बोगद्याजवळ आला होता. फुलंब्री ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल अनंत ज्ञानोबा पाचंगे यांनी बुधवारी दुपारी फिर्याद दिली. दरम्यान, महामार्गावर स्टंटबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिला.

स्टंटबाजांची गय नाही सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी समृद्धी महामार्गावर तरुण-तरुणी येत आहेत. ते स्टंटबाजी करत असून वाहने, शस्त्रांसह फोटो काढत आहेत. असे प्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...