आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विशेष:तरुणांचा वर्कप्लेस मंत्र, काम स्वत:च्या अटींवर आणि कंपनीच्या अपेक्षांची पूर्तता

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठवड्यात केवळ चार दिवस काम. कार्यालयात येणे अनिवार्य नाही. कुठूनही काम करण्याचे स्वातंत्र्य (वर्क फ्रॉॅम एनीव्हेअर). काही वर्षांपूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी जनरेशन जीच्या अटी-शर्ती ठरू लागल्या आहेत. जनरेशन जीमध्ये १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेल्यांचा समावेश होतो. जनरेशन जीचे कर्मचारी कंपनीकडून असलेल्या अपेक्षांबाबत देखील सजग आहेत. ते कंपनीसमोर स्पष्टपणे आपल्या गरजा मांडतात. त्यामुळे आठवड्यात चार दिवस काम आणि वर्क फ्रॉम एनिव्हेअरची सुविधाही त्यांना मिळू लागल्या आहेत. विविध पाहण्यांनुसार तरुण पिढी वारंवार नोकरी बदलण्यात संकोच ठेवत नाही. त्यामुळे अशा पिढीच्या कर्मचाऱ्यांना कंपनीत टिकवून ठेवणे कठीण काम आहे. कंपन्यादेखील जेन-जीच्या रचनात्मक गोष्टींचा वापर करू इच्छितात. अशा पिढीला अनुकूल वाटावे अशा प्रकारचे वातावरण कंपनीकडून दिले जाते. अनेक कंपन्या आपल्या तरुण कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्य, आर्थिक सल्ल्यासारख्या सुविधाही उपलब्ध करून देतात.

तरुण पिढीच्या दृष्टीने वेतनापेक्षा करिअरला महत्त्व लिंक्ड इनच्या पाहणीत ४० टक्क्यांहून जास्त कर्मचारी म्हणाले, करिअरमध्ये काही प्रगतीची शक्यता असल्यास वेतनात पाच टक्क्यांपर्यंत घट स्वीकारण्याची नव्या पिढीची तयारी असते. कंपन्या तरुणांचा प्राधान्यक्रम लक्षात घेऊन त्यांना करिअरमध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देतात.

बातम्या आणखी आहेत...