आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सोशल मीडियावर मदतीच्या हाकेला धावली तरुणाई; 36 हजार सोशल मीडिया सदस्य, 400 ग्रुपद्वारे ‘सीएमएस’कडून गावे, शहरांत मदत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाकाळात अशी केली मदत

भारत आणि परदेशातील तरुणाईचा एका ग्रुप सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचा हात देत आहे. कोरोनाकाळात वैद्यकीय साहित्य पुरवण्यापासून ते पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. छत्रपती मराठा साम्राज्य (सीएमएस) असे या ग्रुपचे नाव आहे. या ग्रुपचे सोशल मीडियावर ३६ हजार सदस्य आहेत, तर महाराष्ट्र व इतर राज्य मिळून ४०० सोशल मीडिया ग्रुप आहेत. भारताबाहेरील सदस्यही ग्रुपमार्फत जोडले गेले आहेत. ग्रुपचे सदस्य महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, कर्नाटकसह परदेशात ओमान, यूएई, अमेरिका, कॅनडा, आफ्रिका, सौदी अरेबिया, कतार, कुवेत, नेपाळ, टांझानिया, युरोप या ठिकाणी कार्यरत आहेत.

ज्यांना मदतीची गरज आहे त्यांची माहिती सोशल मीडियावर व ग्रुपवर टाकली जाते. त्यानंतर संबंधित शहर, गावात सदस्य संपर्क करून गरजूंना मदत करतात. सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये सुमारे ५०० डॉक्टर्स आहेत. ते वैद्यकीय मदतीच्या येणाऱ्या पोस्टला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. सीएमएस कोअर कमिटीमध्ये जितेंद्र पवार, धनराज भोसले, महेश गव्हाणे, ओंकार देशमुख, अभिजित देशमुख, सुहास झांजे, दत्ता शिंदे, सारंग पाटील, पप्पुराज भरकड, विक्रम भोसले, नवीन मोरे, आदित्य जगदाळे, नवीनराज पाटील यांचा समावेश आहे.

कोरोनाकाळात अशी केली मदत

  • ग्रुपने कोरोनाकाळात ३०० हून अधिक गरजवंतांना प्लाझ्मा रक्त मिळवून दिले.
  • रुग्णालयांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या.
  • पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये १७०० पेक्षा जास्त कुटुंबांना जीवनावश्यक किटचे वाटप केले.

सोशल मीडियाचा योग्य वापर
या ग्रुपच्या माध्यमातून निःस्वार्थ, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे मराठा समाजाच्या प्रगतीसाठी काम केले जाते. समाजसेवेसाठी सोशल मीडियाचा योग्य वापर कसा केला जाऊ शकतो हेच संस्थेने दाखवून दिले आहे. सुहास झांजे, केमिकल इंजिनिअर, ओमान, मूळ गाव आष्टी, बीड.

बातम्या आणखी आहेत...