आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुवकांनो, जर तुमच्याकडे सर्वोत्कृष्ट ‘बिझनेस आयडिया’ असेल तर तुम्ही ‘टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर’शी (टीबीआय) संपर्क करा. ते तुम्हाला ३० लाखांपर्यंतचे अर्थसाह्य करतील अन् तुमच्या स्वप्नातील उद्योग उभा करण्यास मदत हाेईल, असा सल्ला ज्येष्ठ उद्योगपती तथा ‘डिक्की’चे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी दिला. ते ‘पद्म फेस्टिव्हल’साठी औरंगाबादला आले होते, त्या वेळी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने त्यांच्याशी खास बातचीत केली.
कांबळे म्हणाले, ‘पुण्यात पाच टीबीआय आहेत. शिवाय राज्य सरकारच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इनोव्हेशन सोसायटी’ आहे. विद्यापीठे, मोठ्या तंत्रशास्त्र संस्थांमध्ये ‘अटल इन्क्युबेशन सेंटर्स’ आहेत. येथेही ‘बिझनेस आयडिया’ सादर करू शकता. आपली आयडिया खरोखर इनोव्हेटिव्ह असेल तर तुम्हाला आर्थिक सहकार्य मिळेल. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाला देशातील सर्व टीबीआय संलग्न आहेत. आपल्याकडे ४५० इन्क्युबेटर सेंटर्स आहेत. ३० लाखांचे अर्थसाह्य घेताना तुम्ही (ओसीपीएस) ऑप्शनल कन्व्हर्टेबल प्रीफर्ड शेअर्स करू शकतात. हे शेअर फक्त तुम्ही कागदावर द्यायचे आहेत.
तुमच्याकडे पैसे, भाग भांडवल नसले तरी चालेल, पण कुशाग्र बुद्धी हवी. युवकांना उद्योग, स्वयंरोजगार उभारण्यासाठी सध्या सर्वोत्तम काळ आहे. काही सरकारी योजनांत स्वत:चा ५ ते १० टक्के शेअर द्यावा लागतो, तो गरजेचा आहे. अन्यथा आर्थिक मदत करणारी वित्तीय संस्था दिवाळखोरीत निघते. बिझनेसची ओनरशिप हवी असेल तर तुम्हाला काही तरी स्वतःचे द्यावेच लागते..!’ आजच्या युवकांत संवाद कौशल्याचा अभाव आहे. पण त्यासाठी ऑनलाइन कोर्सेस आहेत. विशेषत: इंग्रजीचा न्यूनगंड असतो. असंख्य ऑनलाइन स्पीकिंग कोर्स आहेत. त्यात भाग घेऊन स्वत:च्या करिअरच्या दृष्टीने स्वत:मध्ये बदल करावा, असेही कांबळे यांनी म्हटले आहे.
एकूण कंपन्यांपैकी ५०० मध्ये महिलांचेच वर्चस्व उद्योगातच काय, सर्वत्र महिलांचे प्रतिनिधित्व कमी आहे. पण, सध्या मुंबई शेअर बाजाराकडे नोंदणी असलेल्या एकूण कंपन्यांपैकी सुमारे ५०० कंपन्यांत महिलांचेच वर्चस्व आहे. आम्ही लोक सरकारला आमच्या सूचना आणि अनुभव सांगतो. त्या आधारावर उद्योगांना चालना देण्यासाठी सरकार योजना आखते. योजना बनवताना काही त्रुटी जरूर राहतात. पण हा सगळा ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ आहे. हळूहळू आपण स्वावलंबन संकल्पाकडे वाटचाल करत असल्याचेही त्यांनी म्हटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.