आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकांना जोडण्याचा निर्धार:वंचित बहुजन आघाडीची युवा संवाद यात्रा सुरू

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवक, युवतींना आघाडीसोबत जोडून, त्यांना सक्रिय राजकारणात संधी देऊन, युवकांचे नेतृत्व पुढे आणणे या उद्देशाने ५ फेब्रुवारीपासून युवा संवाद यात्रा सुरू करण्यात आली. शिवाजीनगर येथून यात्रेस प्रारंभ झाला. इंदिरानगर, शंभूनगर, काबरानगर या भागांमध्ये ही पदयात्रा करण्यात आहे. युवकांना वंचित युवा आघाडी सोबत जोडण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. ही यात्रा १२ फेब्रुवारीपर्यंत पश्चिम भागातील विविध वॉर्डांत येऊन युवक-युवतींसोबत संवाद साधणार आहे. युवा आघाडीचे युवा शहराध्यक्ष डॉ. तानाजी भोजने, सतीश गायकवाड, लता बामणे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...