आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी इम्पॅक्ट:औरंगाबादेत युवा सेनेची कार्यकारिणी जाहीर, घराणेशाहीला फाटा; 69 पैकी 57 पदे सामान्य कार्यकर्त्यांना

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेपाठोपाठ युवा सेनेच्या कार्यकारिणीची कायम चर्चा असते. आतापर्यंत नेत्यांच्या मुलांनाच ही पदे बहाल केली जात होती, परंतु तब्बल नऊ वर्षांनंतर सामान्य कार्यकर्त्यांना या कार्यकारिणीत महत्त्वाची पदे मिळाली आहेत. ‘युवा सेनेत नेत्यांच्या चिरंजीवांना झुकते माप’ अशा आशयाचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने २० जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते. त्यामुळे मुलाखत घेण्यासाठी आलेले वरुण सरदेसाई यांनी त्याची दखल घेत काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार ६९ पदांपैकी ५७ पदे ही सामान्य कार्यकर्त्यांना जाहीर झाली आहेत.

युवा सेनेत शहर अधिकारी असलेल्या हनुमान शिंदेला या वेळी जिल्हाप्रमुखाचे पद देण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्हाप्रमुख असलेल्या ऋषिकेश खैरे यांना युवा सेनेमध्ये राज्याचे उपसचिवपद देण्यात आले आहे. २० जानेवारी रोजी सुभेदारी विश्रामगृहात इच्छुकांच्या मुलाखती झाल्या होत्या. युवा सेनेचे सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ असलेले वरुण सरदेसाई आणि निखिल वाळेकर यांनी या मुलाखती घेतल्या होत्या.

जंजाळ यांचे कार्यकर्ते अधिक
युवा सेनेेचे राज्य उपसचिव व माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची नव्या कार्यकारिणीवर छाप दिसत असल्याची चर्चा आहे. मागच्या वेळी युवा सेनेच्या पूर्व मतदारसंघात असलेल्या पदाधिकाऱ्यांकडे या वेळी विविध मतदारसंघांत प्रमुखपदाची जबाबदारी आहे. यातील बहुतांश पदाधिकारी जंजाळ यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते.

नेत्यांच्या मुलांनाही स्थान
या कार्यकारिणीतही काही नेत्यांच्या मुलांना स्थान देण्यात आले आहे. ऋषिकेश खैरे यांना राज्य उपसचिचपद देण्यात आले आहे, तर अंबादास दानवे यांचे चिरंजीव धर्मराज दानवे याला मध्य मतदारसंघाच्या शहर चिटणीसपद देण्यात आले. याशिवाय शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांचे पुतणे अभिजित थोरात, किरण तुपे, राजतिलक मेघावाले, किरण सुरे, अक्षय पोलकर, रोहित स्वामी, साखर वाघचौरे यांचा या कार्यकारिणीत समावेश आहे. आमदार प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव ऋषिकेश जैस्वाल यांच्याकडे यापूर्वी महाविद्यालय कक्षप्रमुख ही जबाबदारी होती. या कार्यकारिणीत अजून तरी त्यांचे नाव नाही.

अशी आहे कार्यकारिणी
युवा सेनेत शहर आणि ग्रामीण भागासाठी दोन जिल्हाप्रमुख असतात. याशिवाय प्रत्येक मतदारसंघासाठी एक शहरप्रमुख नेमला जातो. शहर आणि फुलंब्री मिळून एक जिल्हाप्रमुख असतो. जिल्हा समन्वयक हे पद संदीप लिंगायत, जिल्हा चिटणीस मिथुन व्यास, किरण तुपे यांच्याकडे देण्यात आले आहे, तर फुलंब्री मतदारसंघाचे प्रमुखपद अवधुत अंधारे, पूर्व ज्योतिराम पाटील, पश्चिम शेखर जाधव, मध्य मतदारसंघाचे शहरप्रमुखपद साखर खरगेकडे आहे. उपशहरप्रमुख म्हणून सतीश चव्हाण, भूषण बकाल, हेमंत दांडगे, मनोज क्षीरसागर, नारायण सुरे, पराग कुंडलवाल, अमर लोखंडे, सागर भारस्कर यांनाही जबाबदारी देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...