आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:युवा सेनेकडून खाद्यतेलाला  भावपूर्ण ‘श्रद्धांजली’ अर्पण , वाढत्या महागाईविरोधात चौकाचौकात आंदोलन

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या महागाईविरोधात युवा सैनिकांनी रविवारी शहरातील विविध चौकांत तेलाच्या डब्याला हार घालून भावपूर्ण ‘श्रद्धांजली’ वाहिली. तसेच थाळीनाद करून महागाई आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या वेळी विधानसभा मतदारसंघनिहाय आंदोलन करण्यात आले. यात फुलंब्री विधानसभा मतदारसंघात मुकुंदवाडी, पूर्व मतदारसंघातील चिश्तिया चौक, मध्य मतदारसंघातील टीव्ही सेंटर, पश्चिम मतदारसंघात कोकणवाडीत थाळीनाद आंदोलन करण्यात आले. कोरोना पळवून लावण्यासाठी जसे पंतप्रधानांनी थाळी वाजवण्याचे सांगितले होते त्याचप्रमाणे महागाई हटवण्यासाठी थाळीनाद केल्याचे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या वेळी मुकुंदवाडी चौकात युवा सेना जिल्हाप्रमुख हनुमान शिंदे, शहरप्रमुख अवधूत अंधारे, शहर चिटणीस किरण लखनानी, दत्ता कनसे, प्रशांत कुर्हे, भूषण बकाल, योगेश ओळेकर आदींनी आंदोलन केले. चिश्तिया चौकात शहरप्रमुख ज्योतिराम पाटील, स्वप्निल डिडोरे, मोहित श्रीवास्तव, बळीराम देशमाने यांनी थाळीनाद केला. टीव्ही सेंटर चौकात युवा सेना महाविद्यालय कक्षप्रमुख ऋषिकेश जैस्वाल, संदीप लिंगायत, किरण तुपे, नारायण सुरे, शहरप्रमुख सागर खरगे, अभिजित थोरात, धर्मराज दानवे, नागेश थोरात, आकाश जैन, मधुर चव्हाण यांनी घोषणाबाजी केली. कोकणवाडीत उपजिल्हाप्रमुख पराग कुंडलवाल, शेखर जाधव, नंदकुमार म्हस्के, दत्ता शेलार, राहुल वाणी, अजय चोपडे, सागर वाघचौरे, देविदास रत्नपारखी, मिथिल ढोक आदींनी केंद्र सरकारविरोधात घोषणा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...