आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफएमचा शो:युवराज्ञी शनिवारी होस्ट करेल 94.3 माय एफएमचा शो

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोटा आरजे सीझन तीनच्या सहाव्या आठवड्यात युवराज्ञी पाटील शो होस्ट करणार आहे. कार्यक्रमात आरजे युवराज्ञीकडून मॉडेलिंग टिप्स ऐकायला मिळणार आहे. ९४.३ माय एफएमच्या छोटा आरजे सीझन तीनमध्ये निवड झालेल्या युवराज्ञीचा कार्यक्रम २४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता प्रसारित होईल.

मागील दोन वर्षांप्रमाणे याही वर्षी यंग भास्कर आणि ९४.३ माय एफएमतर्फे छोटा आरजे हा उपक्रम राबवला आहे. त्यास जोरदार प्रतिसाद मिळाला. अनेक पालकांनी मुलांचा व्हिडिआे पाठवून भाग घेतला. त्यातील काही निवडक मुलांचीच निवड झाली आहे. उपक्रमात भाग घेण्यासाठी ७ ते १२ वयोगटातील मुलांसाठी रजिस्ट्रेशन ठेवले होते. ज्यात त्यांना १ मिनिटापर्यंत स्टोरी टेलिंग, मिमिक्रीचा व्हिडिओ पाठवायचा होता. शंभरपेक्षा जास्त मुलांनी सहभाग घेतला. त्यातून फक्त आठ जणांची निवड झाली आहे. दर शनिवारी श्रोत्यांना एका नवीन आरजेला ऐकायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...