आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक महोत्सव:प्रवीण बर्दापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झेप साहित्य संमेलन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संकल्प शिक्षण, सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे कवयित्री हरणाबाई जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झेप साहित्य संमेलन २५ डिसेंबर रोजी होत आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर असतील. इप्का कंपनीचे व्यंकट मैलापुरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. वाळूज येथील हायटेक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर प्रतापसिंग बोदडे साहित्यनगरीत हा कार्यक्रम होईल. डॉ. वासुदेव मुलाटे, डॉ. ऋषिकेश कांबळे उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष डॉ. बी. जी. गायकवाड यांनी दिली.

सकाळी ८ वाजता दिग्दर्शक मनोज कदम यांच्या उपस्थितीत संविधान रॅलीने सुरुवात होईल. डॉ. सावली राऊत यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. प्रा. पंजाबराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली “लोकशाही जीवनप्रणाली आणि भारतीय मानसिकता’ विषयावर परिसंवाद होईल. लोकशाहीर नानाभाऊ परिहार, विजयकुमार कस्तुरे यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम होईल. या वेळी अनिल पवार, राजीव फुके, नारायण फाकळे, डॉ. राजेंद्र शेजूळ, डॉ. मिलिंद रणवीर यांचा गौरव करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...