आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिकन, अंडीवर मारा बिनधास्त ताव:जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बर्ड फ्लू जनजागृती अभियानांतर्गत चिकन महोत्सवाचे आयोजन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • बिनधास्त चिकन खा, कोणताही धोका नाही असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात बर्ड फ्लुचा संसर्ग नाही. बिनधास्त चिकन आणि अंडी खाऊ शकतात. हा संदेश देण्यासाठी चक्क औरंगाबाद जिल्हा परिषदेतील मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, जि.प. उपाध्यक्ष एल.जी.गायकवाड यांच्यासह इतर विभागातील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी बुधवारी चिकनवर ताव मारला. बिनधास्त चिकन खा, कोणताही धोका नाही असेही यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

औचित्य होते, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभाग आणि कन्नड तालुक्यातील वाकद गावच्या वाकेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड, शेलगावच्या पूर्ण महिला अॅग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील महसूल प्रबोधिनी सभागृहात बर्ड फ्लू जनजागरण अभियानांतर्गत चिकन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्ष एल.जी.गायकवाड होते. सामान्य प्रशासनाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी शिरीष बनसोड, महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेखा माने, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. संजय गायकवाड, जि.प.उपायुक्त डॉ.प्रशांत चौधरी, शिवराज केंद्रे, कार्यकारी अभियंता झेड.ए. काजी, डॉ.आर.एस. पेडगावकर, दिलीप निरफळ, विजय चव्हाण यांची उपस्थिती होती.

डॉ.गोंदावले म्हणाले, कोरोनाचा प्रभाव कमी होत असतांनाच बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राज्यस्थान राज्यातील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील परभणी, बीड, लातूरच्या काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले होते. यामुळे अनेक ठिकाणी अफवा पसरवल्या जात होत्या की चिकन, अंडी खालल्याने बर्ड फ्लू पसरतो. याचा परिणाम कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांवर झाला आहे. परंतु औरंगाबाद जिल्हयात अशी एकही बर्ड फ्लूची एकही घटना नाही. अंडी आणि कुक्कुट मास ७० डिग्री तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाने पूर्णत:सुरक्षित आहे. यातून तुम्हाला प्रोटीन मिळते जे आरोग्यासाठी आरवश्यक आहे. असे डॉ.गोंंदावले म्हणाले.

कारभारी मनगटे यांनी देखील चिकन अंडी खाल्लयाने बर्ड फ्लू होत नाही. कुक्कुट पालन व्यावसायिक कसे अडचणीत आलेत याविषयी मत मांडले. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वत: चिकन खाऊन जनजागृती केली. प्रास्ताविक डॉ. सुरेखा माने यांनी केले. आर.एस.दडके यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...