आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिस कॉल द्या अन् गोष्ट ऐका:जिल्हा परिषद प्रशालेचे विद्यार्थी घेत आहेत "इंडिया गेट्स रिडिंग' चा आनंद

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद जिल्हयातील शंभर शाळेतील विद्यार्थ्यांना लाभ
  • विद्यार्थ्यांसाठी मोफत उपक्रम टोल फ्री नंबरवर सुविधा उपलब्ध

आजवर आपल्यापैकी अनेकांनी छान छान गोष्टींची पुस्तक वाचली असतील. तर काहींनी आजी-आजोंबांच्या सहवासात प्रत्यक्ष गोष्टी ऐकण्याचा आनंदही घेतला असेल. परंतु जसजस तंत्रज्ञान वाढल. पुस्तकांच वाचन काही अंशी कमी झालं आहे. काहींच्या वाचनाविषयीच्या आवडीनिवडीही बदलल्या आहेत. मात्र सध्याचा काळ हा कोरोनाचा प्रादुुर्भाव असल्याने प्रत्यक्ष दुकानात जावून खरेदी करण शक्य नाही, शिवाय शाळा बंद असल्याने शाळेतील ग्रंथाल्याच्या पुस्तकांचाही आनंद घेता येत नाही. अशावेळी सहा महिन्यांपासून शाळेपासून आणि वाचनापासून दूर असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा वाचन प्रवाहात आणण्यासाठी औरंगाबाद जिल्हयातील शंभर शाळांमध्ये मिस कॉल द्या अन् छान छान गोष्टी ऐका हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. याचा लाभ विद्यार्थी घेत असून, संस्कारक्षम गोष्टींबरेाबरच शाळेत या उपक्रम एक सुंदर चिंत्रांचे ग्रंथालय देखील शाळांना उपलब्ध होत आहे.

नेहमीच असं म्हटलं जात की मुलं वाचत नाही. खरं तर त्यांना हवी ती पुस्तक त्यांच्या आवडीनुसार आणि वयोमानानुसार उपलब्ध देखील व्हायला हवीत. याच उद्देशाने रूम टु रिड या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील सहा जिल्हयामध्ये "इंडिया गेट्स रिडिंग' अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. खरं तर या उपक्रमांतर्गत रूम टु रिड ही संस्था विद्यार्थी संख्येच्या आधारावर शाळेची निवड करुन त्यांची एक व्यक्ती समन्वयक म्हणून शाळेत ठेवते. शाळेतील एका खोलीची निवड ही ग्रंथालयासाठी करते. त्यासाठी चार ते पाच लाख रुपयांचा खर्च, रंगरंगोटी, सजावट, चित्रांचा वापर स्वत:च करते. अशा एकूण शंभर शाळा औरंगाबादमध्ये या संस्थेने निवडल्या आहेत. मात्र सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. पुस्तकांपर्यंत मुलांना येण्यात अडचणी असल्याने आणि शाळा बंद असल्याने ते शक्य नाही. यामुळे छान छान संस्कारक्षम गोष्टी आणि वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका असा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना एक टोल फ्री नंबर देण्यात आला असून, ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी मोफत देण्यात आली आहे. अशी माहिती जि.प. शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

बॅलेन्स असो वा नसो गोष्टीचा आनंद घ्या

विद्यार्थ्यांकडे फोनमध्ये बॅलेन्स असो वा नसो १८००१०२८७८६ या टोल फ्री नंबरवर विद्यार्थी मिस कॉल देवून गोष्टी एेकू शकता. यात रोज एक नवीन गोष्ट विद्यार्थी ऐकू शकता. यात संस्थेच्या वतीन शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देखील देण्यात येते की पुस्तक कसं निवडाव, पुस्तक कशी वाचावीत, प्रत्येक वयोगटानुसार विद्यार्थ्यांचा विचार या उपक्रमात करण्यात आला आहे.

सूरजप्रसाद जयस्वाल प्राथमिक शिक्षणाधिकारी

मला गोष्टी आवडतात- मला नेहमीच गोष्टी ऐकायला आणि वाचायला आवडतात. या उपक्रमात आम्ही आतापर्यंत बुट, शूज, जादूचा दगड, हल्ला झाला या गोष्टी मिस कॉल देऊन ऐकल्या आहेत. गौरव संभेराव विद्यार्थी

बातम्या आणखी आहेत...