आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिटमिट्यात संरक्षक भिंत:दीडशे एकरात 150 काेटी खर्चून झूलॉजिकल पार्क ; पिंजरे बांधणे सुरू

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐतिहासिक औरंगाबादेत पर्यटकांसाठी दीड वर्षात नवीन झूलॉजिकल पार्क तयार करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मिटमिटा येथील दीडशे एकर जागेवर प्राणिसंग्रहालय उभारण्याचे काम सुरू आहे. संरक्षण भिंत, प्राण्यांसाठी पिंजरे, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, प्रशासकीय इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामांवर सुमारे दीडशे कोटी रुपये खर्च हाेणार असून ती डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होतील. त्यानंतर सिद्धार्थ उद्यानातील प्राणी झूलॉजिकल पार्कमधील मोकळ्या जागेत साेडले जातील.

सिद्धार्थ उद्यानातील जागा अपुरी पडत असल्याने येथील प्राणी मिटमिटा येथे हलवण्याचा निर्णय पाच वर्षांपूर्वीच मनपाने घेतला होता. त्यानुसार चार वर्षांपूर्वी शासनाने मिटमिटा येथील गट क्रमांक ३०९ मध्ये दीडशे एकर जागा दिली. स्मार्ट सिटीने या कामाच्या तीन वेगवेगळ्या निविदा काढल्या. दीडशे एकर जागेला चारही बाजूंनी १० फूट उंच भिंत आणि त्यावर २ फुटांची तार अशी १२ फुटांची संरक्षक भिंत बांधण्यात येत ओह. त्यावर १३ कोटी रुपये खर्च हाेतील. या भिंतीची लांबी ४.२ किलोमीटर आहे. आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती प्रकल्पप्रमुख इम्रान खान यांनी दिली. झूलॉजिकल पार्कला लागूनच सुमारे १०० एकरांवर सफारी पार्कसाठी जागेची मागणी केली आहे.

७०० प्राण्यांची क्षमता
प्राणिसंग्रहालयाच्या आतील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, प्रशासकीय इमारती आदी ५८ कोटींची कामेदेखील वेगाने सुरू आहेत. ती पूर्ण करण्यासाठी १२ महिन्यांची मुदत दिली आहे. प्राण्यांचे पिंजरे आणि इतर संलग्न काम ६२ काेटींत हाेणार असून यासाठी स्वतंत्र ठेकेदार नियुक्त केला आहे. प्राण्यांचे एकूण ५२ पिंजरे आणि त्यासमोरील मोकळी जागा विकसित केली जाईल. एकूण ७०० प्राणी येथे असतील. त्यामुळे देशातील मोठ्या प्राणिसंग्रहालयांपैकी औरंगाबादचे झूलॉजिकल पार्क असेल.

बातम्या आणखी आहेत...