आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:जि.प. आरोग्य विभागास कोरोनाचे ग्रहण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. घोलप क्वारंटाईन ?

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक
  • आरोग्य विभागात सॅनिटायझेशन; दोन दिवस विभाग बंद

जिल्हयाची काळजी घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागालाच आता काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण आरोग्य अधिकारी यांनाच क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी दिली आहे. कामानिमित्त एकमेकांशी संपर्क येत असल्याने त्यांना आरोग्याशी संबंधीत तक्रारी जाणवत असल्याने त्यांना पुढील १४ दिवस घरीच क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे जि.प.त बोलले जात आहे.

सध्या औरंगाबाद मध्ये संपूर्ण जिल्हयात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासन स्तरावर आणि आरोग्य विभाग आम्ही काळजी घेत आहोत असा दावा करत असले तरी रोज वाढणारी रुग्ण संख्या आणि अपुऱ्या सुविधांमुळे यंत्रणेच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. शिवाय ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग काम पाहत असतो. याकामी विविध लोकांशी संपर्क येत असला तरी पुरेशी काळजी व सतर्कता बाळगून आरोग्य अधिकारी तसेच कर्मचारी आपले काम करत आहेत. तरीदेखील जिल्हा परिषद मुख्यालयातील  ८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने आरोग्य यंत्रणेतच आता भितीचे वातावरण आहे. त्यातच आता खुद्द जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. बी. घोलप यांनाच क्वारंटाईन करण्यात आल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे.

डॉ. घोलप यांना काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्या येत असल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे जि.प.तील सूत्रांनी सांगितले. सोमवार दि. २२ जून रोजी त्यांना स्वतःच्या घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खुद्द आपले वरिष्ठ अधिकारी क्वारंटाईन झाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. तरीदेखील सर्व कर्मचारी आपले काम करत इतर ठिकाणी बसून करत आहेत. आहे.

दरम्यान खबरदारी म्हणून  संपूर्ण विभागात सॅनिटायझेशन प्रक्रिया तसेच आवश्यक खबरदारीचे उपाय केले जात आहेत. यासाठी रविवार, २१ जून पासून दोन दिवस विभाग बंद राहणार आहे. मात्र काम बंद ठेवणे शक्य नसल्याने या दरम्यान कर्मचारी मिळेल त्या ठिकाणी आपले कार्यालयीन काम करत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी दिली.

डीएचओ पदाला ग्रहण !

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला गेल्या काही दिवसांपासून स्थायी आरोग्य अधिकारी मिळालेला नाही. तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते हे कोरोना काळात जिल्हा बंदी असताना औरंगाबादहून बाहेर जात असताना त्यांच्या शासकीय वाहनात अवैध दारू व रक्कम सापडल्यामुळे त्यांच्या जागी डॉ. डी. बी. घोलप यांना प्रभारी आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान, डॉ. घोलप यांच्या नियुक्तीआधी या पदासाठी दोन नावांची चर्चा झाली होती. नेमके कोणाला पदभार द्यायचा यावर दोन दिवस चर्चा झाली. अखेरीस डॉ. घोलप यांची नियुक्ती झाली. मात्र आता ते स्वतः क्वारंटाईन झाल्याने पुन्हा एकदा हे पद रिकामे झाले असून, आता नव्याने अधिकारीची नियुक्ती होणार आहे. तसेच डॉ. घोलप हे बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा पूर्ववत पदावर रुजू करण्यात येईल असेही बोलल जात आहे.तर आरोग्य अधिकाऱ्याचा पदभार हा डॉ.गंडाळ यांच्याकडे देण्यात येणार आहे.

ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये !

जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे आवश्यक त्या उपाययोजना सुरु आहेत. गावोगावी आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी यांच्याकडून ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. सर्व आरोग्य केंद्रांना, उपकेंद्रांना तसेच कोव्हीड केअर सेंटर्सला आवश्यक यंत्रसामुग्री व औषधीचा पुरवठा करण्यात आलेला आहे. नागरिकांनी ताप किंवा तत्सम लक्षणे आढळ्यास लपवून न ठेवता तात्काळ आरोग्य केंद्रांशी संपर्क सोडून पुढील उपचार घ्यावेत. -अविनाश गलांडे पाटील आरोग्य सभापती, जिल्हा परिषद

बातम्या आणखी आहेत...