आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:जि.प. कार्यालयातून वेळ संपण्यापूर्वी घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना विभाग प्रमुखांचे अभय

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक
  • जि.प.च्या ११९ कर्मचाऱ्यांना नोटिसा देवून आठ दिवस उलटले तरी उत्तर नाही

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी घेतलेल्या झाडाझडतीत कार्यालयीन वेळ संपण्याआधीच घरी पळणारे कामचुकार ११९ कर्मचारी सापडले होते, त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. परंतु आठ दिवसाहून अधिक वेळ नोटिस बजावण्यास होवूनही कर्मचाऱ्यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही. या कर्मचाऱ्यांना विभाग प्रमुखांचेच अभय मिळत असल्याने असे प्रकार वारंवार होत असल्याचा आरोप जि.प. सदस्यांनी केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासकीय कार्यालयांची उपस्थिती जेमतेम होती. सोशल आणि फिजिकल डिस्टन्स पाळण्यासाठीच्या सुविधेचा कर्मचाऱ्यांनी मात्र याचा चांगलाच वेळगा स्वअर्थ काढला. कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यावर खबरदारी म्हणून जि.प. कार्यालय पाच दिवस बंदही ठेवण्यात आले होते. परंतु नंतर कार्यालयांमध्ये १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली . तरीही अनेक कर्मचारी कार्यालयांमध्ये वेळेत येत नाही. तसेच घरी कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच लवकर जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी सोमवारी दि. १७ सायंकाळी ६ वाजता अचानक अनेक विभागांची झाडाझडती घेतली. कार्यालयीन वेळ ६.१५ वाजेपर्यंत असताना जवळपास ११९ कर्मचारी कार्यालयात हजर नसल्याचे दिसून आले.

यामध्ये शिक्षण विभागातील ३५, आरोग्य ३५, बांधकाम १२, वित्त २१, सिंचन १० आणि कृषी विभागात ६ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. या कर्मचाऱ्यांना दि. १८ ऑगस्ट रोजी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तर आता पुन्हा असा प्रकार दिसल्यास कडक कारवाई करण्ण्यात येईल असेही बनसोडे यांनी सांगितले. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त येईल असे वाटले होते. परंतु अजूनही प्रकार तसेच सुरू असून, एकाही कर्मचाऱ्याने अद्याप बजावण्यात आलेल्या नोटीसला उत्तर दिलेले नाही. असे सदस्यांनी सांगितले.