आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनव प्रयोग:" हाजीमेशाते सान, दो झो योरोशुकू ' नमस्कार भेटून आनंद झाला;जि.प. शाळेतील विद्यार्थी गिवतायेत जापनीज भाषेचे धडे

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

" हाजीमेशाते सान, दो झो योरोशुकू ' नमस्कार भेटू आनंद झाला असे सुदीक्षा अमृता म्हणते, तर वैष्णवी ," कानोज्यो नो ओ नामाए वा नान देस का?' तिचे नाव काय आहे. ही कोणती भाषा असे प्रथम ऐकणाऱ्यांना वाटेल. तर मित्रांनो ही आहे जपानी भाषा. हे संवाद साधाणारे विद्यार्थी कोणत्याही मोठ्या इंग्रजी माध्यमातील शाळेचे विद्यार्थी नसून तर हे आहेत गाडीवाट या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आहेत. जे आता आपल्या वर्ग मित्रांशी जपानी भाषेत संवाद साधत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्या बद्दल पालक शिक्षक आशावादी असून, या प्रयोगाने सर्वांसमोर एक आदर्शन निर्माण केला आहे.

देशभरात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे यंदा परीक्षा न घेताच शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत. आता शाळा कधी सुरु होणार याबाबत अजून स्पष्टता नसली तरी शाळा मात्र ऑनलाइन सुरु आहेत. अनेक सुविधा आणि मोठ्या इमारतीत भरणाऱ्या शाळांमधील आवश्यक साहित्य उपलब्धअता आपण नेहीमच पाहता. परंतु गरीबांच्या पोरांची शाळा म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद शाळा देखील आता कात टाकत आहेत. याचे उदाहरण म्हणजे औरंगाबाद शहरापासून आत आडवळी भागात असलेले गाडीवाट या गावात जिल्हा परिषद शाळा आहे. सध्या प्रत्यक्ष वर्ग नसला तरी ऑनलाइन शाळा सुरु आहेत. हा वर्ग झाल्यानंतर विद्यार्थी खेळतांना जापनीज भाषेची तयारी करतात. ही मुले इयत्ता पाचवी ते आठीच्या वर्गातील आहेत. या विद्यार्थ्यांना जापनीज भाषेचे अभ्यासक सुनील जोगदेव हे गुगल मिटच्या माध्यमातून ऑनलाइन विनामूल्य ही भाषा शिकवत असल्याचे शिक्षक दादासाहेब नवपुते यांनी सांगितले. लॉकडाऊन काळाने अनेक परिणाम हे शिक्षण क्षे़त्रावर झालेे आहेत. काही वाईट तर काही चांगल्या गोष्टी माणस शिकत आहेत. त्याचाच हा एक प्रयोग असल्याचे शिक्षक म्हणाले. जापनीज भाषेतील संधीही मुलांना खुनावत असल्याने त्यांना ही भाषा शिकतांना मज्जाही येत आहे.

असा सुरु झाला अभिनव प्रयोग

परदेशी भाषा उपक्रमांतर्गत मुख्याध्यापक पद्माकर हुलजुते यांच्याकडे जापनीज भाषा विद्यार्थ्यांना शिकवावी असा मानस व्यक्त केला. त्यावर विस्तार अधिकारी रमेश ठाकुर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना जापनीज भाषा शिकवण्यात येत आहे.

रोबोटिक्समुळे जापनीजची निवड

आज मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसित झाले आहे. खऱ्या अर्थाने आपण लॉकडाऊनमुळे डिजिटल युगात वावरतो आहे. मुलांना देखील आम्ही कोणती भाषा शिकायला आवडेल असे विचारले असता त्यांनी जापनीज भाषेची निवड केली. या भाषेसाठी शाळेने २० विषयमित्र केले. हे विषयमित्र स्वत: शिकून इतर वर्ग मित्रांना शिकवतील याप्रमाणे नियोजन केले. हे २० विषय मित्र आता ८० विद्यार्थ्यांना शिकवतायेत. आता एकूण शंभर विद्यार्थी सध्या जापनीज भाषा शिकवत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...