आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आ. प्रशांत बंब यांच्याविरोधात शिक्षक आक्रमक:औरंगाबादेत भव्य मोर्चा, राज्यभरातून हजारो शिक्षक सहभागी

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकांमधील संघर्ष आता चांगलाच पेटला आहे. पावसाळी अधिवेशनात आ. प्रशांत बंब यांनी शासकीय सेवेतील शिक्षकांबाबत केलेल्या विधानाविरोधात आज औरंगाबादेत शिक्षकांनी भव्य मोर्चा काढला.

औरंगाबादेत आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत शिक्षक सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील हजारो शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्रशांत बंब यांच्या निषेधाच्या टोप्याही शिक्षकांनी घातल्या आहेत. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, शिक्षक भारतीचे कपिल पाटीलदेखील आंदोलनात सहभागी झाले आहेत.

राज्यभरातील शिक्षक व शिक्षक संघटनांही सहभागी.
राज्यभरातील शिक्षक व शिक्षक संघटनांही सहभागी.

काय म्हणाले होते आ. बंब?
नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार प्रशांत बंब म्हणाले होते, जिल्हा परिषद शाळेतील अनेक शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत. अशा शिक्षकांमुळेच राज्यातील शाळांचा दर्जा घसरलेला आहे. तसेच, अशा शिक्षकांचे भत्तेही बंद करायला हवेत, असे वक्तव्य प्रशांत बंब यांनी केले होते. राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे.

अशैक्षणिक कामेच अधिक

आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांनी म्हटले आहे की, अधिवेशनात प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल अतिशय लज्जास्पद वर्तन केले. शिक्षक मुख्यालयी राहत नाही. गुणवत्तापूर्ण काम करत नाही, असे बेताल वक्तव्य प्रशांत बंब यांनी केले. मात्र, शिक्षकांच्या मागे अनेक अशैक्षणिक कामे असतात. हा सर्व भार सांभाळून ते शिक्षणदानाचे काम करतात. याबाबत प्रशांत बंब यांनी कधी आवाज उठवल्याचे ऐकले नाही.

आ. बंब यांनी शिक्षकांना बदनाम केले, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
आ. बंब यांनी शिक्षकांना बदनाम केले, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.

मुख्यालयी शौचालयेही नाहीत

मुख्यालयी जिल्हा परिषदेचे शिक्षक राहत नाही, या आरोपावर आंदोलक म्हणाले, अनेक गावांमधील मुख्यालयात एका ठिकाणी 12-12 शिक्षकांची नियुक्ती केली जाते. तेथील खोल्यांमध्ये साधी शौचालयाची सुविधाही पुरवली जात नाही. प्रत्येक शिक्षकाला राहण्यासाठी चांगली खोली व शौचालयाची सुविधा दिल्यास शिक्षक मुख्यालयी का राहणार नाहीत, असा सवाल आंदोलकांनी केला.

आंदोलक म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना बदनाम करण्याचे काम काही व्यक्ती करत आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या सन्मानासाठी ही रॅली काढली आहे.

बातम्या आणखी आहेत...