आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आली निवडणूक:कळंब तालुक्यात 1 लाख 31 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार

कळंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील तीस ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. या निवडणुकीत १लाख ३१ हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रंग भरण्यास सुरुवात झाली आहे.

तीस सरपंच व २८२ ग्रामपंचायत सदस्य करीता निवडणूक होत आहे. गावागावात राजकीय चर्चा रंगु लागल्या आहेत. कोण सरस, कोण कोणाला सोबत घेत आहे, जातीय गणिते कशी मांडली जात आहेत. युवकांना संधी कशी दिली जात आहे, गावाचा विकास कोणी किती केला, गावाचा कारभारी कोण होणार याची पारावर चर्चा रंगू लागली आहे.

तालुक्यातील तीस ग्रामपंचायत च्या निवडणुकीत पुरुष ६८०७० व महिला ६०१६६ असे मिळून एकूण १,३१,४१२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुक तालुक्यातील तीन मोठ्या ग्रामपंचायतीच्या सुध्दा निवडणूक होत आहे. शिराढोण मध्ये पुरुष ३८२१, महिला ३४५९ असे एकुण ७२८० मतदार आहेत. त्यापाठोपाठ डिकसळ पुरुष ३०८०, महिला २७८० असे एकुण ५८६० मतदार, खामसवाडी पुरुष २९३१, महिला २४६५ असे एकुण ५३९६ मतदार, मोहा पुरुष २६८२, महिला २३४२ असे एकुण ५०२४ मतदार आहेत.

तीस ग्रामपंचायतींमध्ये अशा पद्धतीने स्त्री-पुरुष मतदान करणार
ग्रामपंचायत निवडणूक मध्ये मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून गौरगाव पुरुष ६४५, महिला ५३२, असे एकूण ११७७ मतदार, निपाणी पुरुष ६७०, महिला ६४९ असे एकुण १३१९ मतदार, खडकी पुरुष ३८५, महिला ३१४ असे एकुण ६९९ मतदार, सौंदणा (अंबा) पुरुष ६७६, महिला ६१३ असे एकुण १२८९ मतदार, मस्सा (खं) पुरुष १८९९, महिला १७०१ असे एकुण ३६०० मतदार, वाघोली पुरुष ७५३, महिला ६३९ असे एकुण १३९२ मतदार, लोहटा (पश्चिम) पुरुष ६९४, महिला ६२७ असे एकुण १३२१ मतदार, लोहटा (पुर्व) पुरुष १२७९, महिला १२२५ असे एकुण २५०४ मतदार, गौर पुरुष १४५९, महिला १३२२ असे एकुण २७८१ मतदार, हासेगाव (के) पुरुष १०७२, महिला ९२८ असे एकुण २००० मतदार, तांदुळवाडी पुरुष ४७५, महिला ४३६ असे एकुण ९११ मतदार, खेर्डा पुरुष ४३४, महिला ४१८ असे एकुण ८५२ मतदार, शेळका धानोरा पुरुष ६१७, महिला ५६८ असे एकुण ११८५ मतदार, नागझरवाडी पुरुष ५८१, महिला ५०३ असे एकुण १०८४ मतदार, करंजकल्ला पुरुष ८०१, महिला ६७८ असे एकुण १४८९ मतदार, रत्नापूर पुरुष १०७७, महिला ९८१ असे एकुण २०४८ मतदार, हासेगाव (शि) पुरुष ६००, महिला ४८६ असे एकुण १०८६ मतदार, बोरगाव (ब्रु) पुरुष ५०६, महिला ४३८, असे एकुण ९४४ मतदार, गोविंदपुर पुरुष ११२८ महिला ९१६ असे एकुण २०४४ मतदार, कोथळा पुरुष १०८७, महिला ९३६ असे एकुण २०२३ मतदार, नागुलगावपुरुष ४७७, महिला ३७९ असे एकुण ८५६ मतदार,आवड शिरपुरा, पुरुष ९७०, महिला ८५६ असे एकुण १८२६ मतदार, वाठवडा पुरुष १०५१, महिला ८७३ असे एकुण १९२४ मतदार, हिंगणगाव पुरुष ५६४, महिला ५३२ असे एकुण १०९६ मतदार, बाभळगाव पुरुष ७९४, महिला ७३६ असे एकुण १५३० मतदार, अंदोरा पुरुष १६५४, महिला १५२२ असे एकुण ३१७६ मतदार आहेत.

बातम्या आणखी आहेत...