आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जकेकूरवाडीत होणार 1 हजार नारळ झाडांची लागवड; लोकसहभागातून उपक्रम, प्रयोग यशस्वी ठरल्यास भारतात पहिला मान

उमरगा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच जून जागतिक पर्यावरण दिन थोड्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्याचा संकल्प तालुक्यातील जकेकुरवाडी ग्रामपंचायतीने घेतला असून गावात तब्बल एक हजार नारळाची लागवड लोकसहभागातून लावण्याचा उपक्रमाची रविवारी (०५) सुरवात करण्यात आली.

जकेकुरवाडीचे युवा सरपंच अमर सुर्यवंशी यांनी संकल्पना मांडली व स्वखर्चाने १०१ नारळाचे झाडे देण्याची घोषणा केली. उपसरपंच सुनीता जगताप यांनी ५१, ईश्वर सुर्यवंशी ४१, शातप्पा गुरुजी २१ तर गावातील नागरिकांनी एकूण ६१ झाडे देण्यास सुरुवात केली.गावातील महिलांनीही वृक्ष लागवडी मध्ये सहभाग घेऊन वृक्षदान करण्यास सुरुवात केली. सदर झाडाचे उत्पन्न हे ग्रामपंचायत कार्यालयतर्फे विविध विकास कामे, सामाजिक उपक्रमासाठी करण्यात येणार आहे. याचे भविष्यात उत्पन्न मोठ्या प्रमाणात झाल्यास ग्रामपंचायतीचे कडून घेण्यात येणारा मालमत्ता कर पूर्ण पणे बंद करण्यात येईल.

लोकसहभागातून एकाच वेळी एक हजार नारळाची झाडे लावणारे जकेकुरवाडी हे महाराष्ट्रात नाही तर भारतात सुद्धा प्रथम गाव ठरेल अशी माहिती ग्रामसेवक गणेश माळी यांनी दिली. या उपक्रमाचे अनुकरण शेजारील गावाने सुद्धा केल्यास पर्यावरण नक्कीच सुधारेल त्याबरोबर ग्रामपंचायत आर्थिक सक्षम होऊ शकतात असे मत उपसरपंच सुनीता जगताप, व्यंकट औरदे, ओमशिवा मुळे, मधुकर सुर्यवंशी, अर्चना सुर्यवंशी, विष्णु गायकवाड, देवीदास सुर्यवंशी, धनुरे परमेश्वर आदींनी सांगितले.

युवा सरपंच यांच्या संकल्पनेला ग्रामस्थांनी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार करून ‘घर तेथे नारळाचे झाड’ ही संकल्पना सत्यात उतरविण्यास सुरुवात केल्याने भविष्यात या उपक्रमाला खंड पडू न दिल्यानस गावात वृक्षांची संख्या कुटुंबसंख्येच्या तिप्पट होणार आहे. सार्वजनिक ठिकाण व प्रत्येक घरासमोर नारळाचे झाड लावण्याचा निर्णय घेऊन युद्धपातळीवर अंमलबजावणी ही सुरू केली. ग्रामस्थांनी कुठले अनुदान अथवा मदतीची अपेक्षा न करता नारळाची झाडे लावण्यासोबत जोपासण्याचा निर्णय घेतलेला आहे.

आंध्रातून रोपे मागविणार
नारळाची झाडे राजमंद्री(आंध्रप्रदेश)येथील नर्सरी मधून मागवण्यात येणार असून एका झाडाची किंमत साधारण पाचशे-सातशे रुपये असून उंची साधारण १२ फुटापर्यंत आहे. ही झाडे पहिला पाऊस पडल्याबरोबर आणण्यात येणार आहेत. सर्व नागरिक व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत सातशे नारळाच्या झाडांची लोकसहभागातून नोंदणी झाली असून उर्वरीत तीनशे झाडांची दोन दिवसात नोंदणी होईल असे सरपंच सुर्यवंशी यांनी सांगितले आहे. नारळाच्या झाडे कुठे लावायची याचा कृती आराखडा तयार होत असून त्याचे संगोपन ग्रामपंचायत कार्यालय स्वतः करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...