आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राष्ट्रीय महामार्गावर 15 दिवसांत 10 अपघात; चौपदरीकरणाची गती संथच, खड्डयांमुळे वाहन चालकांसमोर अनेक संकटे

उमरगा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे सोलापूर-कर्नाटक सीमेपर्यंत शंभर किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरण रस्त्याच्या कामापैकी नळदुर्ग ते सीमेपर्यंतच्या संथगतीने सुरू असलेल्या व रखडलेल्या कामाने रस्त्याची दुरवस्था झालेली असून,याचे दुरुस्तीकडे कोणीही लक्ष देत नसल्याने होणाऱ्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. १५ दिवसाचे काळात दहा अपघात ४ गंभीर तर १६ जण जखमी झाले असून,अनेकांना अपंगत्व आले आहे.

सोलापूर टोलवेज प्रा.लि.कंपनीला सोलापूरपासून कर्नाटक सीमेपर्यंत शंभर किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम बीओटी तत्वावर काम देण्यात आले आहे. मुख्य कंपनीने सोलापूर ते येणेगूरपर्यंत या साठ किलोमीटर काम व्होरा इंफ्रास्ट्रक्चर लि.(व्हीटीएल) आणि येणेगूर ते सीमेपर्यंतचे चाळीस किलोमीटर अंतराचे काम पीबीएआय कंपनीला दिले. गेल्या दहा वर्षात येणेगूर ते सीमेपर्यंतच्या रस्त्याचे काम कासवगतीने सुरू असून, या कामाचा दर्जाही निकृष्ट पध्दतीने होत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर ४३ किलोमिटर अंतरावर हजारो ठिकाणी गुडघ्यापर्यंत खड्डे पडले असून पुलाचे कामही अद्याप अपूर्ण आहे. मध्यंतरी रस्त्यासाठी संपादित केलेल्या शेतजमिनीचा योग्य प्रमाणात मावेजा मिळत नसल्याने आंदोलन केल्याने आणि महामार्गाच्या लगत असलेल्या गावांना पर्यायी रस्ता तयार करतांना उड्डाण पुल/भुयारी मार्ग करावा, यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केल्याने काही दिवसाचा कालावधी असाच गेला.

दाळिंब ग्रामपंचायतीचे रास्ता रोकोचा इशारा
तालुक्यातील दाळिंब गाव राष्ट्रीय महामार्ग असून गावाच्या मध्यभागातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग जुना नऊ व नवीन ६५ या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. आठ दिवसात रस्त्याची दुरुस्ती न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच एस एस कुंभार, उपसरपंच आसिफ शिलार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...