आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी मंजूर:मुख्य रस्ते विकासासाठी 10 कोटी मंजूर

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शिवपुरी रोड व त्रिकोळी रोड या मुख्य रस्त्यांच्या कामांसाठी दहा कोटी रुपयाचा निधी नगरविकास विभागाकडून मंजूर झाल्याची माहिती उमरगा- लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पत्रक काढून दिलेली आहे.

मागील अनेक वर्षांपासून दुरावस्थेत असलेल्या व उमरगा शहरातील नागरिकांची प्रमुख मागणी असलेल्या शिवपुरी रोड आणि त्रिकोळी रोड या रस्त्यांच्या कामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर महावीर मेडिकल ते शिवपुरी कॉलनीकडे जाणारा रस्त्याचे (शिवपुरी रोड) रस्ता व गटार करण्यासाठी सात कोटी रुपये तर राष्ट्रीय महामार्ग ते चिंचोळे मंगल कार्यालयाकडे जाणारा रस्ता व गटार करण्यासाठी तीन कोटी रुपये असा दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...