आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजकीय दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायतीचा विसावा सरपंच, दहा हजार मतदार उद्या रविवारी ठरविणार असून तिरंगी लढतीत गावकारभारीण कोण होणार हे ठरणार आहे. प्रचारसभा व रॅलीने प्रचाराची सांगता करण्यात आली. तेर ग्रामपंचायतीच्या ६ प्रभागातून १७ सदस्य निवडून द्यायचे आहेत. शिवाय सरपंचपद थेट जनतेतून निवडला जाणार आहे.तेरचे सरपंचपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे.निवडून येणाऱ्या महिला सरपंच या चौथ्या महिला सरपंच ठरणार असून तेरच्या इतिहासातील विसाव्या सरपंच होणार आहेत.
या चुरशीच्या निवडणुकीत भा.ज.पा.प्रणीत डॉ.पद्मसिंह पाटील ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आ.राणाजगजितसिह पाटील यांच्या हस्ते करून स्थानिक पुढाऱ्यांनी प्रचार यंत्रणा राबविली. केलेल्या कामाचा वचनपुर्ती अहवाल सादर केला आहे. शुक्रवारी मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचार फेरी काढण्यात आली .तर आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी मतदारांना संबोधित करताना जिल्हयाच्या व तेरच्या विकासाचा आराखडा मतदारासमोर मांडला.
महाविकास आघाडीच्या संत गोरोबाकाका ग्रामविकास पॅनलने वातावरण ढवळून काढले. आमआदमी व रा.स.प.च्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही निवडणुकीत उडी टाकली. त्यामुळे या निवडणुकीत रंगत आली आहे.१८ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत डॉ.पाटील पॅनलच्या दिदी काळे,महाविकास आघाडीच्या संत गोरोबाकाका ग्रामविकास पॅनलच्या गीता पवार व आप रा.स.प.पुरस्कृत वैराग्य महामेरू ग्रामविकास पॅनलच्या नंदा पवार आपले नशीब अजमावीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.