आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवराञोत्सव:आरोग्य शिबिरात 10 हजार महिलांची झाली तपासणी ;रक्तातील साखरेची चाचणी करण्यात येणार

ईट6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवराञोत्सव महोत्सवामध्ये शासनाकङून " माता सुरक्षित तर घर सुरक्षित " हे अभियान सुरू करण्यात आले होते.या अभियनांतर्गत ईट प्राथमिक आरोग्य केंद्रातील येत असलेल्या २४ गावातील १० हजार महिलाची तपासणी आरोग्य विभागा मार्फत करण्यात आली.प्रारंभी हे अभियान फक्त नवराञ मध्ये चालविण्यात येणार होते.मात्र या अभियानाला महिलाचा प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याची मुदत वाढविण्यात आली.प्राथमिक आरोग्य केंद्र , उपकेंद्रातर्गत आरोग्य सेविका प्रत्येकाच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आल्या.आपल्या घराकडे घरातल्या सदस्याची काळजी घेणाऱ्या महिला या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात.

हे या " अभियानामध्ये हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.ईट प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये २४ गावे येतात.या २४ गावामध्ये १० हजार ४६२ महिलाची संख्या आहे.या १० हजार ४६२ महिला पैकी आरोग्य विभागाकङून १० हजार महिलाची तपासणी करण्यात आली.या अभियाना मध्ये महिलाच्या हिमोग्लोबीन, रक्तातील साखरेचे प्रमाण,मधुमेह आदीच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.१० हजार महिलाच्या तपासण्या करण्यात आल्या पैकी - उच्चराक्तदाब - ४५ , रक्तक्षय - १४, मधुमोह - ४१ तसेच ईतर आजारातील - ३५ ( दात दुखणे,कान दुखणे आदी ) महिलाची लक्षणे दिसून आली आहेत.

बातम्या आणखी आहेत...