आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगी लढत:तेरच्या सरपंचपदाच्या तिरंगी लढतीत भाजपाला 10 तर; मविआला 7 जागा

तेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजकीय दृष्टीने महत्वाच्या असलेल्या तेर ग्रामपंचायतीवर भाजपने आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता कायम राखीत सरपंच पदाच्या उमेदवार दिदी लोकेश काळे व १० जागांवर विजय मिळविला तर महाविकास आघाडीने ७ जागा जिंकून आपली ताकद वाढल्याचे दाखवून दिले आहे. आप व रासपपुरस्कृत पॅनलला खातेही उघडता आले नाही.

तिरंगी लढतीत भाजपाच्या दिदी लोकेश काळे यांना ४०६५ तर महाविकास आघाडीच्या गिता पवार यांना २७७८ मते मिळाली यात दिदी काळे यांत १२८७ मताची आघाडी घेऊन विजयी झाल्या.आप-रासपला च्या उमेदवार नंदा पवार यांना अल्प मते मिळाली.

वार्ड क्र.१ मध्ये भाजपच्या सुवर्णा भास्कर माळी व लतीफा कोरबू तर महाविकास आघाडीचे अमोल कसबे विजयी झाले.वार्ड २ मध्ये भाजपचेप्रतीक नाईकवाडी वराजकन्या काळे तर महाविकास आघाडीचे अविनाश आगाशे निवडून आले. वार्ड क्र.३ मध्ये भाजपचे पै.नवनाथ पसारे,अर्चना लोमटे,व गीताजंली साळुंके यांनी विजय संपादन केला.

वार्ड क्र.४ मध्ये भाजपाचे श्रीमंत फंड,व रामा कोळी,तर महाविकास आघाडीच्या भाग्यश्री आंधळे विजयी ठरल्या. वार्ड क्र.५ मध्ये भाजपचे अजीत कदम तर महाविकास आघाडीच्या जयश्री अभिमान रसाळ निवडून आल्या. वार्ड क्र.६ मध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत महाविकास आघाडीने तीनही जागा खेचून आणल्या या जागेवर पत्रकार बापू नाईकवाडी,आशा नामदेव कांबळे व प्रियंका लखन रसाळ भरघोस मतांनी निवडून आल्या.

बातम्या आणखी आहेत...