आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणुक:आपसिंगा, काक्रंब्यासह 10 गावे संवेदनशील ; अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचाराचा धुराळा शुक्रवार (दि. १६) सायंकाळी ५ वाजता खाली बसला. दरम्यान ग्रामपंचायत निवडणूक होणार असलेल्या आपसिंगा, काक्रंब्यासह तालुक्यातील १० गावे संवेदनशील असल्याचे जाहीर करण्यात आले असून याठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तालुक्यातील ४८ ग्रामपंचायती साठी रविवार (दि. १८) मतदान होणार आहे.

तालुक्यातील ४८ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर तालुक्यातील मसला खुर्द, वडगाव लाख आणि खुदावाडी ग्रामपंचायतचे सरपंचपद बिनविरोध निवडून आले आहेत. या शिवाय सदस्यांच्या ४१ जागा बिनविरोध निघाल्या आहेत. गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेला जाहीर प्रचार शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता थांबला असून यानंतर प्रत्यक्ष गाठी भेटीला वेग येणार आहे.दरम्यान पोलीस विभागाने तालुक्यातील आपसिंगा, काक्रंबा, नंदगाव, काटी, सावरगाव, देवसींगा तुळ, निलेगाव, मसला खुर्द, केमवाडी आणि काटगाव आदी १० गावे संवेदनशील असल्याचे जाहीर केले आहे. या गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...