आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्राक्षांची आरास‎:आई तुळजाईला‎ 100 ‎ किलो द्राक्षांची आरास‎

तुळजापूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोसमातील पहिल्या द्राक्षांची‎ गुरुवारी श्री तुळजाभवानी मातेला‎ आरास करण्यात आली.‎ तालुक्यातील सांगवी काटी येथील‎ देवीभक्ताने आपल्या बागेतील‎ द्राक्षांचा पहिला तोडा तुळजाभवानी‎ चरणी वाहिला. सायंकाळची‎ अभिषेक पूजा होईपर्यंत द्राक्षांची‎ आरास भाविकांना दर्शनासाठी‎ खुली करण्यात आली होती.‎ तालुक्यातील सांगवी काटी येथील‎ विशाल मगर या भक्ताने देवीला‎ आपल्या बागेतील १०० किलो द्राक्षे‎ वाहिली.

तत्पूवी साळी-चोळीची‎ पूजा बांधून कुटुंबीयांसह दर्शन‎ घेतले.‎ सकाळच्या अभिषेक पूजेनंतर‎ सिंहासनावर द्राक्षांची आरास‎ करण्यात आली होती. ही आरास‎ करण्यासाठी जवळपास चार कॅरेट‎ द्राक्षे लागल्याची माहिती धार्मिक‎ व्यवस्थापक विश्वास कदम यांनी‎ दिली. सायंकाळी भाविकांना प्रसाद‎ म्हणून द्राक्षे वाटप करण्यात आली.‎ तुळजाभवानी मातेला विविध देशी‎ विदेशी फुलांसह फळांची आरास‎ करण्याची प्रथा आहे. भाविकांच्या‎ इच्छे वरून तसेच मंदिर संस्थानच्या‎ परवानगीने तुळजाभवानी मातेला‎ आरास करण्यात येते. तुळजाभवानी‎ मातेला आरास करण्यासाठी गेल्या‎ काही वर्षात भाविक पुढे येताहेत.‎

बातम्या आणखी आहेत...