आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:बोरगावकर विद्यालयाचा 100 टक्के निकाल, विद्यार्थ्यांचा सत्कार

अणदूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हुतात्मा बाबूराव बोरगावकर माध्यमिक शाळेचा (साखर कारखाना साइट नळदुर्ग) दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेतून पूनम चव्हाण हिने ९५.६० टक्के गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला. सनिक्षा राठोड हिने ९५.४० टक्के गुण घेत द्वितीय तर श्रुती विभुते हिने ९४ टक्के गुण घेत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे जीवन विकास शिक्षण संस्थेचे संचालक मोहन भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणवंतांचे जीवन विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदित्य बोरगावकर, उपाध्यक्ष ऋषिकेश मगर, सचिव सुनील चव्हाण, मुख्याध्यापक राजकुमार नरवडे यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी गुरव दिलीप, कोरे यशवंतप्पा, रवींद्र भोसले, मोहन भोसले, राजेंद्र दासकर, कल्पना पाटील, नरे विरसंगप्पा, भोकरे शुभांगी, जाधव शरद, मेलगिरी प्रेमानंद, भोसले ज्ञानेश्वर या शिक्षकांसह पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.