आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य बहुजनसमाजाला एका धाग्यात बांधण्यात कारणी लावले. राजर्षी शाहू महाराजांनी अवलंबलेले आरक्षण आणि शैक्षणिक धोरण समाजहिताचे होते, असे मत कमलाकर सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
शहरातील पालिकेसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शुक्रवारी (दि. ६) सकाळी दहा वाजता राजर्षी शाहू महाराजांचा १०० व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यावेळी श्री. सूर्यवंशी बोलत होते. राजर्षी शाहू महाराज यांच्या निर्वाणाला १०० वर्षे पूर्ण झाल्याने १०० सेकंदांसाठी स्तब्ध राहून सामुदायिक मानवंदना दिली. यानिमित्ताने शाहू महाराज यांनी आपल्यासाठी काय काय करून ठेवले, त्याचे स्मरण केले जावे. त्यांच्या कार्याची स्मृती प्रत्येकाच्या मनात रुजावी, असा या मागचा उद्देश असल्याचे अभिमन्यू भोसले यांनी सांगितले.
पुढे बोलताना श्री. सूर्यवंशी म्हणाले की, शाहू महाराजांनी समाजकारण, कला, क्रीडा, शेती, उद्योग, व्यापार, जलव्यवस्थापन कार्य देशाला अभिमान वाटेल, असा कारभार केला आहे. राजर्षी शाहू महाराजांनी रयतेसाठी केलेले कार्य आपण फेडू शकणार नाही. परंतु त्यांच्या पावन स्मृतीस केलेले अभिवादन येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, असे सांगितले. या वेळी ॲड. मल्हारी बनसोडे, बाबूराव टिळे, नरेश सुरवसे, उमाजी गायकवाड, अजय सरपे, फुलचंद कांबळे, गौतम सूर्यवंशी, श्रीधर सरपे, शिवाजी जाधव, दिलीप सुरवसे, राजू सूर्यवंशी, ॲड. उध्दव भोसले, भागवत निकम, शंकर कांबळे, राजेंद्र सूर्यवंशी, गो. ल. कांबळे, दगडू भोसले यासह बहुजन समाजबांधवांनी सहभागी होवून मानवंदना दिली. मिलिंद कांबळे यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले.
श्रमजीवी अध्यापक महाविद्यालयात अभिवादन
शहरातील श्रमजीवी अध्यापक महाविद्यालयात लोकराजे राजर्षी शाहू महाराजांच्या शताब्दी स्मृतिदिन शुक्रवारी (दि ०६) प्रतिमा पूजन प्राचार्य डॉ विजय सरपे यांचे हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ सरपे यांनी शाहू महाराज यांच्या शिक्षण विषयक विचारांना उजाळा देत ‘शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सुद्दी लढवय्ये कधी ही निपजणारा नाही. म्हणूनच सक्तीच्या व मोफत शिक्षणाची अत्यंत गरज आहे.हा शाहू महाराजांचा विचार आजहि प्रेरणादायी ठरतो. कला, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय मिळवून देण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केले. अंधश्रद्धा, कर्मकांड, दैववाद यावर प्रहार करणारा राजा म्हणजे शाहु महाराज होय. यावेळी प्रा डॉ प्रवीणकुमार कदम, प्रा भाऊ पवार, प्रा संतोष अंकुश,प्रा देवीदास चव्हाण व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
उस्मानाबाद रामकृष्ण परमहंस विद्यालय
आज जी शाळा,महाविद्यालयाची गर्दी दिसते व बहुजनांचे असंख्य विद्यार्थी शिक्षण घेताहेत त्याचे श्रेय छत्रपती शाहू महाराजांना आहे. त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेञात क्रांतीच केली असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात स्मृतीदिनी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा.ए,डी.जाधव यांनी केले आहे.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख होते यावेळी उपप्राचार्य प्रा.डॉ.शांतीनाथ घोडके,प्रा.बबन सूर्यवंशी,प्रा.माधव उगीले उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांनी छञपती शाहू महाराज,डॉ.बापूजी साळुंखे,संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे प्रतिमाचे पूजन केले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी केला. .प्रास्ताविक प्रा.माधव उगीले यांनी केले सूञसंचालन डॉ.केशव क्षीरसागर यांनी केले आभार डॉ.शिवाजी गायकवाड यांनी मानले.
पारगावांत १०० सेकंद स्तब्धता
वाशी तालुक्यातील पारगाव येथे शुक्रवारी (ता.६) आरक्षणाचे जनक, असप्रष्य व बहुजन समाजातील विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन शिक्षणाची दारे खुली करणारे, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शताब्दी स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली.सरपंच महेश कोळी,सिद्धेश्वर शहाणे,पत्रकार राहुल डोके, पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मीकांत आटोळे, मनोज औताने यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या शताब्दी स्मृतिदिनानिमित्त सकाळी १० वाजता १०० सेंकद स्तब्धता पाळून छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले.यावेळी जितेंद्र औताने, संतोष माने,बालाजी मोटे,अशोक गायकवाड, संदीप मोटे,विशाल गायकवाड,सचिन तातुडे,अभिजीत आठवले,वासुदेव दारवाडकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक जितेंद्र औताने सर यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.