आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक महिला दिन ८ मार्च २०२३ निमित्त सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद धाराशिव येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितिन बोडके यांच्या मार्गदशनाखाली धाराशिव येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र -१ वैराग रोड, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात दि ५ मार्च रविवारी करण्यात आले होते. या वर्षीची थीम Women Healthy India” अशी असून या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मुले ७८ मुली २७ असे एकूण १०५ विद्यार्थ्यांनी व आरोग्य कर्मचारी यांनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदविला. महिलांचे आरोग्य सुदृढ राहिले तर संपूर्ण घराचे, समाजाचे व देशाचे आरोग्य सुदृढ राहण्याचा संदेश या रॅलीमध्ये देण्याचा प्रयत्न केला.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हालकुडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. ऐवाळे, सीएचओ कॉडिनेटर डॉ. पल्लवी धनके, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शकिल अहमद खान तसेच कर्मचारीवृंद बाळासाहेब काकडे, अनिल मगर, सुहास चव्हाण, किशोर माने, सुमेध बनसोडे, समीर शेख, शितल गायकवाड सर्व आशाताई तसेच रत्नाकर पाटील व शहर परिसरातील तरुण वर्ग लहान मुले यांनी उत्साहात सदर रॅली पार पाडली.नंतर डॉ. शकील अहमद खान यांनी मान्यवरांचे, सहभागी विद्यार्थी यांचे आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.