आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील चार ते पाच महिन्यांपासून गाेवंशीय जनावरांना बाधा होणाऱ्या संसर्गजन्य लम्पी आजाराने ग्रासले आहेत. मात्र, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तातडीने लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात १०९ टक्के लसीकरण केल्याने त्याची फारशी झळ बसली नाही. तीन लाख १७ हजार ४१८ जनावरांपैकी केवळ २१४९ गोवंशीय गाय, बैल, वासरांना याची बाधा झाली. यापैकी २३० जनावरांचा मृत्यू झाला. त्यातून ८१ पशू पालकांना २१ लाख ५९ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून अनुदान देण्यात आले.
जिल्ह्यातील आठही तालुक्यात लम्पी आजाराने थैमान घातले होते. सप्टेंबर महिन्यात या आजाराने गाेवंशीय जनावरांना बाधित करत हातपाय पसरवण्यास प्रारंभ केला होता. त्यावेळी पशूसंवर्धन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधासह गोठे आणि गावांमध्ये फिरुन जनावरांचे लसीकरण करुन घेतले. त्यामुळे या आजाराची लागण होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
विशेष म्हणजे या विभागातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत करुन लसीकरण करुन घेतल्याने बाधित आणि मृत जनावरांची संख्याही अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहेत. विशेष म्हणजे अद्यापही या विभागाकडून नियमित उपचार आणि उपाय योजना राबवण्यात येत आहेत. तसेच टप्प्याटप्याने जसे प्रस्ताव तयार करण्यात येऊन मंजुरी मिळत आहेत, त्यांना नुकसान भरपाईपोटी शासनाकडून अनुदानही देण्यात येत आहेत.
त्यामुळे काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करण्यात येत आहेत. पशू संवर्धन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मदत देण्यासह, शेतकऱ्यांच्या बांधावर आणि गोठ्या वर जाऊन लसीकरण करुन घेतले. तसेच त्यांच्या गोठ्यांचेही निर्जंतुकीकरण करुन घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांच्या संख्या अत्यंत कमी असल्याचे माहिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन तसेच सहाय्यक जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयातून मिळालेल्या माहिती वरुन समोर आले.
सर्वाधिक फटका भूम, परंडा तालुक्यात
लम्पी आजाराचा सर्वाधिक फटका भूम तालुक्याला बसला. येथे ७८ जनावरांचा मृत्यू झाला.परंड्यात ५९ जनावरांचा मृत्यू. उस्मानाबाद तालुक्यात ३८ जनावरे दगावले. उमरगा २० आणि कळंबमध्ये १९ जनावरे दगावली. तुळजापूर, वाशीमध्ये अनुक्रमे आत आणि नऊ जनावरे दगावली आहेत.
८६१ पैकी ४६ जनावरे गंभीर स्थितीत
८६१ जनावरांना लागण झाली असून त्यापैकी ४६ गंभीर आहेत. त्यांच्यावर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपचार सुरू आहे. ८ शिघ्रकृतीशील पथक जिल्ह्यात कार्यान्वित आहेत. त्यांच्याकडून लसीकरण, उपचार, गोठे फवारणी, तसेच या आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून प्रचार-प्रसार करण्यात येत आहे.
लोहारा तालुक्यात एकही बाधित नाही
जिल्ह्यात लम्पीमुळे शेकडो जनावरांना प्राण गमवावा लागला. दुसरीकडे लोहारा तालुक्यात अनेक जनावरे बाधित झाली असली तरी एकाही गाय, वासरू आणि बैलांचा या आजारामुळे मृत्यू झाला नसल्याचे दिसून आले आहेत.
२३० पैकी १९६ प्रस्ताव मदतीसाठी तयार जिल्ह्यात २३० मृत जनावरांना शासनाकडून मदत देण्यात येत आहेत. १९६ प्रस्ताव तयार करुन प्रशासनाला सादर केले. त्यापैकी जिल्हा समितीने आतापर्यंत १६४ जणांचे प्रस्ताव मंजूर केले असून ८१ जणांना प्रत्यक्ष २१ लाख ५९ हजार रुपयांचा लाभही मिळाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.