आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोजवारा:दहावी इंग्रजीच्या पेपरला गोंधळ, मराठीच्या‎ विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका‎

धाराशिव‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात दहावीच्या इंग्रजी पेपरला सोमवारी‎ (दि. ६) प्रचंड गोंधळ उडाला. येथील शरद‎ पवार हायस्कूल येथील परीक्षा केंद्रावर एका‎ हॉलमधील २५ विद्यार्थ्यांना चुकीची‎ प्रश्नपत्रिका देण्यात आली. हे विद्यार्थी मराठी‎ माध्यमाचे असताना त्यांना इंग्रजी माध्यमाची‎ प्रश्नपत्रिका देण्यात आली. यामुळे घाबरलेले‎ विद्यार्थी व पालिकांनी कस्टोडियन कार्यालयात‎ जाऊन तक्रार दाखल केली.‎ शरद पवार हायस्कूल परीक्षा केंद्रावर खोली‎ क्र. ४ मध्ये २५ विद्यार्थी होते. त्यांना प्रश्नपत्रिका‎ वितरीत केल्यावर सर्वच विद्यार्थी गोंधळले.‎ टायटल कॉलममध्ये दहावीचा इंग्रजी पेपर‎ म्हणून नमूद केले होते. परंतु, आपण अभ्यास‎ केल्याप्रमाणे आणि शिक्षकांनी सांगितलेल्या‎ पॅटर्नप्रमाणे प्रश्न नसल्याने विद्यार्थी गोंधळले.‎

त्यांनी तसाच पेपर सोडवला. बाहेर आल्यावर‎ सर्वांनी चर्चा केल्यावर काहीतरी गोंधळ‎ झाल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांनी‎ तत्काळ पालक व शाळेतील शिक्षकांना हा‎ प्रकार सांगितला. तेव्हा सर्वजण जिल्हा परिषद‎ कन्या प्रशालेतील कस्टोडियन कार्यालयाकडे‎ गेले. तेथील अधिकाऱ्यांना हा प्रकार‎ सांगितल्यावर शिक्षणाधिकारी गजानन सुसर‎ यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी तेथे‎ आले. त्यांनी विद्यार्थी, पालक, केंद्रातील‎ कर्मचाऱ्यांशी चर्चा करून हा प्रकार जाणून‎ घेतला. त्यानंतर बोर्डातील अधिकाऱ्यांनाही हा‎ प्रकार सांगितला. दोन तास चर्चा केल्यानंतर‎ पालकांकडून तक्रारी लिहून घेत सर्वच‎ विद्यार्थ्यांना यासंदर्भात योग्य तो दिलासा‎ देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर‎ विद्यार्थी व पालकांनी सुटकेचा श्वास सोडला.‎

सरासरी गुणांचा विपरित परिणाम‎ काही पालक नव्याने पेपर घेण्याची विनंती‎ करत होते. मात्र, काही अधिकाऱ्यांनी सरासरी‎ गुण देण्याची पद्धत असल्याचे सांगितले. म्हणजे‎ अन्य विषयाला किती गुण मिळतात, ते पाहून या‎ पेपरला गुण दिले जातील. मात्र, पालकांनी‎ याला विरोध केला. काही विद्यार्थ्यांचा इंग्रजी‎ विषय चांगला असतो तर अन्य विषय कच्चे‎ असतात. अन्य विषयांची सरासरी पाहिल्यास‎ त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो.‎

तज्ञ म्हणतात, काठिण्य‎ पातळी अधिक
‎इंग्रजी विषयाचे तज्ञ प्रा.‎गोविंद चव्हाण यांनी‎सांगितले की, दोन्ही‎माध्यमांसाठी इंग्रजी‎विषयच असला तरी‎इंग्रजी माध्यमातील‎ प्रश्नपत्रिकेची मराठीपेक्षा अधिक काठिण्य‎ पातळी असते. गुण कमी मिळू शकते.‎

यामुळे प्रकार लक्षात आला नाही‎
शरद पवार हायस्कूलमध्ये इंग्रजीचा पेपर देण्यासाठी‎ २०४ मराठी माध्यमातील, ३ उर्दू व ४३ इंग्रजी‎ माध्यमाचे विद्यार्थी होते. इंग्रजी माध्यमाच्या ४३‎ विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रत्येकी २५ प्रश्नपत्रिका‎ असलेले तीन गठ्ठे केंद्राला मिळाले होते. काही‎ अडचण आली तर पर्याय म्हणून एखादा गठ्ठा‎ अधिक देण्यात येतो. हाच अधिकचा गठ्ठा‎ पर्यवेक्षकांच्या ताब्यात देण्यात आला. तसेच सर्वच‎ माध्यमांचा इंग्रजीचा पेपर असल्याने हा प्रकार‎ लक्षात आला नाही.‎

असा आहे प्रश्नपत्रिकेतील बदल‎
मराठी माध्यमासाठी इंग्रजी पेपर क्रमांक ३ तर इंग्रजी‎ माध्यमासाठी पेपर क्रमांक १ आहे.‎ कोड क्रमांकानुसार ८७५ कोडचा पेपर विद्यार्थ्यांना‎ देणे अपेक्षित होते. ८७४ कोडचा दिला.‎ दोन्ही माध्यमांची पुस्तके वेगवेगळी आहेत. त्यानुसार‎ पेपरमधील प्रश्नही वेगवेगळेच होते.‎ प्रश्नाच्या स्वरूपाचा पॅटर्नही दोन्ही माध्यमांसाठी‎ वेगवेगळा असून अध्यापनही तसेच होते.‎

बातम्या आणखी आहेत...