आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक विवाह‎ सोहळा:सामूहिक विवाह सोहळ्यात‎ 11 जोडप्यांची लग्नगाठ‎

धाराशिव6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकमंगल‎ फाउंडेशनच्या वतीने धाराशिव येथे‎ छायादीप मंगल कार्यालयात‎ शनिवार सामूहिक विवाह‎ सोहळ्यात ११ जोडपे विवाह‎ बंधनात अडकले. विवाह‎ सोहळ्याचे हे १८ वे वर्ष आहे. दुपारी‎ १२ वाजून ३५ मिनिटांनी झालेल्या या‎ सोहळ्याला जिल्ह्यासह लगतच्या‎ जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते.‎

वधुवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी‎ लोकमंगल फाउंडेशनचे प्रणेते‎ सुभाष देशमुख, तुळजापूरचे‎ आमदार राणाजगजितसिंह पाटील,‎ फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख,‎ युवा नेते मनिष देशमुख, भाजप‎ जिल्हाध्यक्ष नितीन काळे, रामराजे‎ पाटील, दत्ता कुलकर्णी, व्यंकट गुंड,‎ रामदास कोळगे, जयराजे‎ निंबाळकर, सुधीर रास्ते, नाना‎ लोमटे, बालाजी शिंदे व‎ जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते,‎ वधूवरांचे नातेवाईक व वऱ्हाडी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...