आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी:उस्मानाबाद-कळंब तालुक्यात रस्त्यांसाठी अकरा कोटींचा निधी; ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार

उस्मानाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने उस्मानाबादसह कळंब तालुक्यातील ग्रामीण भागातल्या ४ रस्त्यांसाठी ११ कोटी, ७० लाख, ७८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी पाठपुरावा केला होता. या निधीबद्दल आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहेत.

आमदार पाटील यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा १ अंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील एक आणि कळंब तालुक्यांतील तीन अशा एकूण चार रस्त्यांच्या कामासाठी ग्रामविकास विभागाने निधी मंजूर केला. यात कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी ते मांडवा या ७.१० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ५ कोटी १० लाख ४३ हजार मंजूर झाले. राज्यमार्ग ते सात्रा या २.५० किमीच्या रस्त्यासाठी एक कोटी ९० लाख ९९ हजार, राज्यमार्ग ते कोकाटेवस्ती या ३ किमीच्या रस्त्यासाठी २ कोटी ६४ लाख १६ हजार रुपयांचा तर उस्मानाबाद तालुक्यातील जवळा ते गुळवेवस्ती.

बातम्या आणखी आहेत...