आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन‎:उस्मानाबादेत 11 ते 13‎ फेब्रु. शंभूराजे महानाट्य‎

उस्मानाबाद‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित‎ झालेल्या शंभूराजे महानाट्य या‎ महाप्रयोगाची पर्वणी यावर्षी‎ शिवभक्तांना मिळणार आहे.‎ मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती‎ महोत्सव समितीच्यावतीने शहरात‎ तीन दिवस महानाट्यचे आयोजन‎ करण्यात आले असून, यासाठी‎ पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी‎ सुमारे २२ लाख रुपयांची देणगी‎ दिली आहे. नाट्य साठी भव्य मंच‎ उभारण्यात येत असून, भूमिपूजन‎ जनता बँकेचे माजी चेअरमन‎ विश्वास शिंदे व बाळासाहेबांची‎ शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरज‎ साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.‎

मल्टीपर्पज हायस्कूलच्या भव्य‎ मैदानावर या महानाट्याचे प्रयोग‎ होणार आहेत. छत्रपती संभाजी‎ महाराज यांच्या जीवनावरील‎ शंभुराजे या महानाट्यचे मोफत‎ आयोजन करण्यात आले आहे.‎ यासाठी पालकमंत्री डाॅ.सावंत यांनी‎ मोलाची मदत केली असून,‎ जिल्हाप्रमुख सूरज साळंुके यांनीही‎ पुढाकार घेतला आहे. महानाट्यच्या‎ भव्य मंचची उभारणी सुरू झाली‎ असून, भूमिपूजनसाठी शिवजयंती‎ महोत्सव समितीचे अध्यक्ष धनंजय‎ राऊत यांच्यासह भारत कोकाटे,‎ जयंत पाटील, बाळासाहेब शिंदे,‎ प्रा.गजानन गवळी, आशिष मोदाणी,‎ संजय मुंडे, प्रशांत पाटील, भिमाण्णा‎ जाधव व इतर उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...