आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर-तुळजापूर-उस् मानाबाद रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ११० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली असल्याने तुळजापूरवासियांचे रेल्वेचे स्वप्न दृष्टीक्षेपात आले आहे. नुकताच राज्य सरकारचे आपला ५० टक्के वाटा देण्याचे जाहीर केले असल्याने तुळजापूर-सोलापूर रेल्वेच्या कामाला गती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२०१४ साली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीर्थक्षेत्र तुळजापूरला रेल्वेचा नकाशावर आणण्याची सर्वप्रथम घोषणा केली होती. त्यानंतर ५ वर्षानंतर २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर -तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वे मार्गाला मंजुरी दिल्याचे जाहीर केले.
मात्र सुरुवातीच्या कालावधीत या रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात तुटपुंजी तरतूद करण्यात आल्याने रेल्वे मार्गासाठी आवश्यक जमिनीचा मोजणीचे काम अतिशय संथ गतीने सुरू होते. अपुऱ्या निधीच्या तरतुदीमुळे तुळजापूरकरांना रेल्वेचा प्रवास धुसर वाटत असतानाच १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात तब्बल ११० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आल्याने रेल्वेच्या कामाला गती येण्याची उर्वरित पान ४
५० टक्के वाटा जाहीर, कामांना गती
नोव्हेंबर २०२२ मध्ये राज्य सरकारने प्रकल्पाचा ५० टक्के वाटा ४५२ कोटी ४६ लाख रुपये देण्याचे जाहीर करताच सोलापूर-तुळजापूर-उस् मानाबाद रेल्वे मार्गाच्या कामाला गती आली आहे. लाईन मार्किंगचे काम पूर्ण झाले असून, भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला अाहे. लवकरच प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया प्रारंभ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रेल्वे मार्ग २ वर्षात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट : सोलापूर-तुळजापूर-उस् मानाबाद रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आलेली ११० कोटींची तरतूद हा रेल्वे मार्ग २०२५ सालापर्यंत पूर्ण करण्याच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मार्गासाठी ४५२.५६ कोटी रुपये राज्याचा हिस्सा मंजूर केला. केंद्र सरकारने पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी १० लाख कोटींची तरतूद केली आहे. यामुळे अर्थकारणाला मोठी चालना मिळणार आहे. २०१९ मध्येच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी राज्य सरकारचा ५० टक्के हिस्सा देण्याची तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना सहमती कळवली होती, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.